• Download App
    पाकिस्तान सापडतोय पुन्हा कोरोनाच्या कचाट्यात, संसर्गाचा दर वाढल्याने चिंता। Corona increases in Pakistan once again

    पाकिस्तान सापडतोय पुन्हा कोरोनाच्या कचाट्यात, संसर्गाचा दर वाढल्याने चिंता

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद – पाकिस्तानात कोरोनाने हाहा:कार माजविला असून देशातील संसर्ग होण्याचा दर हा ९ टक्क्यांच्या आसपास पोचला आहे. गेल्या तीन महिन्यांतील उच्चांक आहे. कोरोना संसर्गाव्यतिरिक्त पाकिस्तानात विविध साथरोग पसरण्याची भीती पाकिस्तान मेडिकल असोसिएशनने दिली आहे. शहरात डासांचा वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन केले जात आहे. Corona increases in Pakistan once again

    सिंध, खैबर पख्तुनवा, पंजाब, इस्लामाबाद, बलुचिस्तान, पाकिस्तान व्याप्त काश्मीररमध्ये कोरोना संसर्गाचे रूग्ण वाढत चालले आहेत. पाकिस्तानात गुरुवारी पॉझिटिव्हीटी रेट हा ९.०६ टक्के राहिला आणि यानुसार ५६६१ रूग्ण आढळून आहे.



    तर आज पॉझिटिव्हीटी रेट ८.१८ टक्के इतका राहिला. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे सिंध प्रांतात ८ ऑगस्टपर्यंत अंशत: लॉकडाउन लागू केले आहे. पॉझिटिव्हीटी रेटमध्ये काल उच्चांक होता. यापूर्वी मे महिन्यात ९.१२ टक्के इतका नोंदला गेला.

    काल ६२ हजार ४६२ जणांचे नमुने घेतल्याचे पाकिस्तान आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कराचीतील स्थिती बिकट बनली असून स्वच्छता कर्मचारी नसल्याने रस्त्यावर सांडपाणी आणि कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे.

    Corona increases in Pakistan once again

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली