• Download App
    कोरोना महामारीचे रुपांतर होऊ शकते जैविक युध्दात, चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांची भीती|Corona epidemic could turn into biological warfare, fears Chief of Defense Staff General Bipin Rawat

    कोरोना महामारीचे रुपांतर होऊ शकते जैविक युध्दात, चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांची भीती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना महामारीचे जैविक युद्धात रूपांतर होऊ शकते. अशा परिस्थितीत सर्व देशांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे, अशी भीती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी व्यक्त केली आहे.Corona epidemic could turn into biological warfare, fears Chief of Defense Staff General Bipin Rawat

    बिपिन रावत यांनी म्हटले आहे. याचबरोबर, बिम्सटेक सदस्य देशांचा समावेश असलेल्या आपत्ती व्यवस्थापन अभ्यासाच्या कर्टेन रेजर कार्यक्रमात, भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी देखील कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आणि संसर्गाच्या प्रकरणांमध्ये होणारी वाढ, यावरून सतर्क केले आहे.



    यावरून कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही, हेच दिसून येते. या कार्यक्रमात भारतासह बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, भूतान, थायलंड, श्रीलंका आदी देश सहभागी होत आहेत.रावत म्हणाले, नवीन व्हेरिएंट युद्धाचे स्वरूप घेत आहे.

    या विषाणूंचा आणि रोगांचा आपल्या देशावर परिणाम होऊ नये म्हणून आपण स्वत:ला बळकट करून त्याचा सामना करावा लागेल. आता कोरोनाचे ओमायक्रॉन व्हेरिएंट समोर आले आहे. जर ते इतर स्वरूपात बदलले, तर आपल्याला त्यासाठी तयार राहावे लागेले.आपल्या सर्वांसाठी आपण आपल्या बुद्धिमत्तेने एकमेकांना साथ देणे अत्यंत आवश्यक आह.

    जगातील सशस्त्र दलांना आपत्तींचा सामना करण्यासाठी विशेष तयारी करावी लागेल. कोरोना दरम्यान, असे दिसून आले की प्रत्येक देशाने आपल्या नागरी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मदत करण्यासाठी संरक्षण दलांचा वापर केला. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट हेही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी सदस्य देशांना नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींशी लढण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन रावत यांनी केले.

    Corona epidemic could turn into biological warfare, fears Chief of Defense Staff General Bipin Rawat

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानात पुन्हा ड्रोन दिसले; होशियारपूरमध्ये 5-7 स्फोट, ब्लॅकआऊट

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!