• Download App
    कोरोना संकटातही विप्रो कंपनी देणार कनिष्ठ कर्मचाऱ्यांना पगारवाढ|Corona crisis, Wipro will give salary increases to junior employees

    कोरोना संकटातही विप्रो कंपनी देणार कनिष्ठ कर्मचाऱ्यांना पगारवाढ

    भारतातील बडी आयटी कंपनी असलेल्या विप्रोने आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतानात वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही वेतनवाढ १ सप्टेंबर २०२१ पासून लागू होणार आहे. त्याचबरोबर चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रमोशनही देण्यात येणार आहे.Corona crisis, Wipro will give salary increases to junior employees


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतातील बडी आयटी कंपनी असलेल्या विप्रोने आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतानात वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही वेतनवाढ १ सप्टेंबर २०२१ पासून लागू होणार आहे. त्याचबरोबर चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रमोशनही देण्यात येणार आहे.

    बंगळुरू येथे असलेल्या विप्रो आयटी कंपनीचे अध्यक्ष अझीम प्रेमजी हे आहेत. विप्रो कंपनीत एकूण १.८५ लाख कर्मचारी आहेत. ज्यामध्ये बी३ बँड (कनिष्ठ) प्रकारातील कर्मचाºयांची संख्या सर्वाधिक आहे. विप्रो कंपनीचे कर्मचारी एकूण पाच प्रकारांत विभागलेले आहेत.



    कंपनीने कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, कोरोना संकटाच्या या कठीण परिस्थितही आमच्या कर्मचाऱ्यांनी व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आणि उच्च दर्जाची सेवा टिकवून ठेवण्याचा निर्धार केला.

    कंपनी बी ३ आणि त्याखालील बँडच्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. सी-१ आणि त्यावरील बँडच्या कर्मचाºयांना १ जून २०२१ पासून वाढीव पगार मिळणार आहे.पगारात नेमकी किती वाढ होणार हे कंपनीतर्फे सांगण्यात आलेले नाही.

    मात्र, चांगली कामगिरी करणाऱ्या बी-३ बँडपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना प्रमोशन देण्यात येईल जे १ डिसेंबर २०२० पासून लागू होईल. विप्रोने सुमारे ७,००० कर्मचाºयांना बढती दिली आहे.विप्रो कंपनीने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत आपल्या कर्मचाºयांना १०० टक्के व्हेरिएबल पे दिले होते. ३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाहित कंपनीच्या निव्वळ नफ्यात ३.१५ टक्के वाढ होऊन २,३६५.७ कोटी रुपये इतका झाला होता.

    Corona crisis, Wipro will give salary increases to junior employees

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    कुकी दहशतवद्यांना मणिपूरमध्ये CRPF कॅम्पला केले लक्ष्य ; बॉम्ब फेकले, दोन जवान शहीद

    काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, अरविंदर सिंग लवली यांचा दिल्ली अध्यक्षपदाचा राजीनामा

    ओडिशात बीजेडीला मोठा धक्का, अनेक नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल!