• Download App
    कर्नाटकात धर्मांतर विरोधी विधेयकाची प्रत काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांनी भर सभागृहात फाडली!!|Copy of anti-conversion bill in Karnataka K. Shivkumar tore the whole hall

    कर्नाटकात धर्मांतर विरोधी विधेयकाची प्रत काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांनी भर सभागृहात फाडली!!

    वृत्तसंस्था

    बंगलोर : कर्नाटक मधील भाजपच्या बसावराज बोम्मई सरकारने मांडलेल्या धर्मांतर विरोधी विधेयकाची प्रत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी विधानसभेच्या सभागृहात फाडून टाकली.Copy of anti-conversion bill in Karnataka K. Shivkumar tore the whole hall

    यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय गदारोळ उठला असून डी. के. शिवकुमार यांनी पवित्र विधानसभा सभागृहाचा अपमान केला आहे, असा आरोप सरकारने केला आहे. या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसचे नेते सभागृहात आणि सभागृहाबाहेर आमने-सामने येऊन त्यांच्यात हमरीतुमरी सुरू झाली आहे.



    आसाम, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश यांच्याप्रमाणेच कर्नाटकातही भाजपच्या बसवराज बोम्मई सरकारने धर्मांतर विरोधी कायदा आणण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेतला आहे. अर्थातच त्या वेळीदेखील काँग्रेसचा विरोध दर्शवला होता.

    परंतु सरकारने हे विधेयक जेव्हा विधानसभा सभागृहात मांडले आणि त्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी संतापाने या विधेयकाची प्रती भर सभागृहात फाडून टाकली. त्यामुळे सभागृहाचा अपमान झाला आहे.

    शिवकुमार यांनी माफी मागावी, अशी जोरदार मागणी भाजपच्या सदस्यांनी लावून धरली. यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. सभागृहाबाहेर देखील भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली.

    कर्नाटक मधील चर्चच्या अनेक संघटनांनी धर्मांतर विरोधी विधेयकाला विरोध केला आहे. आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि आसाम मधील विधेयका प्रमाणेच लव्ह जिहाद तसेच धर्मांतर या मुद्द्यावरून दोषी व्यक्तींना 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद धर्मांतर विरोधी विधेयकात आहे.

    याखेरीज अन्य तरतुदी देखील विधेयकात असून या संपूर्ण विधेयकालाच काँग्रेसने विरोध केला आहे. हा विरोध करतानाच डी. के. शिवकुमार यांनी या विधेयकाची प्रत विधानसभेच्या भर सभागृहात फाडून टाकली. पुढच्या काही काळात या मुद्द्यावरून कर्नाटक आठ आणि देशात मोठ्या प्रमाणावर राजकारण रंगणार आहे.

    Copy of anti-conversion bill in Karnataka K. Shivkumar tore the whole hall

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Tejashwi Yadav : आता तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र!

    Ganga Expressway : हवाई दलाने रचला विक्रम : गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचे रात्रीचे लँडिंग

    Pahalgam attack : सावज दमल्यावर करतात शिकार, पाकिस्तान वाट पाहात असताना भारत उघडपणे का हल्ला करेल??