• Download App
    सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची आयएसआयएस आणि बोको हराम बरोबर तुलना; राजकीय क्षेत्रात वादळ, तक्रार दाखल । Congress’s Salman Khurshid in his new book writes that Hindutva is similar to the jihadist Islamist groups like ISIS and Biko Haram

    सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची आयएसआयएस आणि बोको हराम बरोबर तुलना; राजकीय क्षेत्रात वादळ, तक्रार दाखल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी अयोध्या निकालावर लिहिलेल्या पुस्तकात राजकीय हिंदुत्वाची तुलना आयएसआयएस आणि बोको हराम यांच्यासारख्या कट्टरतावादी इस्लामिक संघटनांशी केली आहे. यावरून राजकीय क्षेत्रात प्रचंड वादळ उठले असून सलमान खुर्शीद यांच्यावर विविध स्तरातून टीकाटिप्पणी सुरू आहेत. Congress’s Salman Khurshid in his new book writes that Hindutva is similar to the jihadist Islamist groups like ISIS and Biko Haram

    सलमान खुर्शीद यांनी पुस्तकात हिंदुत्वावर वक्तव्य करताना महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या हिंदुत्वापेक्षा अन्य कोणतेही हिंदुत्व भारतीय परंपरेत बसत नाही. सनातन हिंदू धर्म राजकीय हिंदुत्वापेक्षा श्रेष्ठ आहे. राजकीय हिंदुत्व आणि आयएसआयएस तसेच बोको हराम यांसारख्या कट्टरवादी विचारसरणी मध्ये कोणताही फरक नाही, असा दावा सलमान खुर्शीद यांनी केला आहे.

    दिल्लीतील एका वकिलाने त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून कोर्टातही यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येणार आहे. एकीकडे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेत आहेत, तर दुसरीकडे सलमान खुर्शीद यांच्या सारखे नेते हिंदुत्व संकल्पनेची तुलना इस्लामिक कट्टरतावादी विचारांशी करून काँग्रेसला राजकीयदृष्ट्या अडचणीत आणत आहेत, असे निरीक्षण काही राजकीय निरीक्षकांनी नोंदविले आहे.

    Congress’s Salman Khurshid in his new book writes that Hindutva is similar to the jihadist Islamist groups like ISIS and Biko Haram

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर उद्या होणार सुनावणी