• Download App
    अरुणाचल ते गुजरात भारत जोडो यात्रा काढणार काँग्रेस : राहुल गांधी म्हणाले- 52 वर्षांपासून आम्हाला स्वतःचे घरही नाही|Congress will take out India Jodo Yatra from Arunachal to Gujarat Rahul Gandhi said - We have not even had our own house for 52 years

    अरुणाचल ते गुजरात भारत जोडो यात्रा काढणार काँग्रेस : राहुल गांधी म्हणाले- 52 वर्षांपासून आम्हाला स्वतःचे घरही नाही

    प्रतिनिधी

    रायपूर : काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये सुरू असलेल्या 85 व्या काँग्रेस अधिवेशनाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी सांगितले की, पक्ष अरुणाचल प्रदेश ते गुजरातपर्यंत भारत जोडो यात्रा काढण्याचा विचार करत आहे. तर राहुल गांधी यांनी 32 मिनिटांचे भाषण केले. भाषणात राहुल यांनी भारत जोडो यात्रा, अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण, जयशंकर यांचे चीनवरील वक्तव्य आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.Congress will take out India Jodo Yatra from Arunachal to Gujarat Rahul Gandhi said – We have not even had our own house for 52 years

    आपल्या भाषणात राहुल यांनी 1977 ची घटनाही सांगितली, ज्यात त्यांना पहिल्यांदाच लक्षात आले की त्यांच्याकडे स्वतःचे घर नाही. ते म्हणाले- 52 वर्षे झाली, अजूनही माझ्याकडे घर नाही. त्यांचे म्हणणे ऐकून सोनिया गांधी भावुक झालेल्या दिसल्या.



    गळाभेटीने ट्रान्समिशन झाल्यासारखे वाटायचे

    राहुल गांधी म्हणाले, ‘आम्ही कन्याकुमारी ते श्रीनगर अशी चार महिने भारत जोडो यात्रा केली. तुम्ही व्हिडिओमध्ये माझा चेहरा पाहिला, पण लाखो लोक आमच्यासोबत फिरले. आम्ही पाऊस, ऊन आणि बर्फात एकत्र फिरलो. खूप काही शिकायला मिळाले. पंजाबमध्ये एक मेकॅनिक येऊन मला भेटला हे तुम्ही पाहिले असेल. मी त्याचा हात धरला आणि मी त्याची वर्षांची तपश्चर्या, त्याची वेदना आणि दु:ख ओळखले. लाखो शेतकर्‍यांशी हस्तांदोलन केले, गळाभेट घेतली, तेव्हा ट्रान्समिशन झाल्यासारखे वाटायचे.

    सुरुवातीला तुम्ही काय करता, तुम्हाला किती मुले आहेत, अडचणी काय आहेत यावर बोललो. असे दीड महिना चालले आणि त्यानंतर काही बोलायची गरज नव्हती. हात धरून, मिठी मारताच त्यांची वेदना एका सेकंदात समजू लागली. काही न बोलता मला काय बोलायचे आहे हे तेही समजून घेत असत.

    अहंकार आणि अभिमान 10-15 दिवसात नाहिसा झाला

    राहुल गांधी म्हणाले- सकाळी उठल्यावर कसं चालत जायचं, याचा विचार करायचो. त्यानंतर वाटायचे की आपल्याला 25 किलोमीटर नाही, तर 3 हजार 500 किलोमीटर चालायचे आहे, कसे चालणार? मग डब्यातून खाली उतरून चालत जायचो. लोकांना भेटायचो. पहिल्या 10-15 दिवसांत अहंकार आणि गर्व नाहीसा झाला.

    माझ्याकडे अजूनही घर नाही

    राहुल म्हणाले, मी लहान होतो, ही 1977 ची गोष्ट आहे. निवडणूक आली, मला काही कळले नाही. घरात विचित्र वातावरण होते. मी आईला विचारले काय झाले मम्मी. आई म्हणाली, आपण घर सोडत आहोत. तोपर्यंत मला घर आपलंच वाटत होतं. मी आईला विचारले की आपण घर का सोडतोय? आईने मला पहिल्यांदा सांगितले की हे आपले घर नाही. हे सरकारी घर आहे. आता इथून निघायचे आहे. मी कुठे जायचे असे विचारल्यावर ती म्हणाली की, कुठे जायचे हे मलाही माहिती नाही. मी चकित झालो. मला वाटलं ते आमचंच घर आहे. 52 वर्षे झाली माझ्याकडे स्वत:चे घरही नाही.

    Congress will take out India Jodo Yatra from Arunachal to Gujarat Rahul Gandhi said – We have not even had our own house for 52 years

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!