वृत्तसंस्था
आग्रा : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात लढविल्या जातील, अशी घोषणा माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांनी केली. Congress will contest elections under priyankas leadership in Up
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापूर्वी २०१७ मधील निवडणुकीत काँग्रेसचा अवघ्या सात जागा मिळाल्या होत्या.
या निवडणुकीत काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, की आम्ही उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढवू. राज्यात पक्ष विजयी होण्यासाठी त्या कठोर परिश्रम घेत आहेत. त्यामुळे, भविष्यात त्या काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनू शकतात.
काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल ते म्हणाले, की आम्ही सामान्य लोकांशी संवाद साधत आहोत. त्यासाठी, योग्य धोरणही पक्षाने आखले आहे. आमच्या जाहीरनाम्यात सामान्यांच्या आशाआकांक्षांचे प्रतिबिंब असेल. यात शेतकरी, महिला सुरक्षेवर भर असेल. त्याचप्रमाणे, देशाची आरोग्ययंत्रणा कमकुवत असल्याचे कोरोनाच्या साथीत उघड झाले आहे. त्यामुळे आरोग्यावरही जाहीरनाम्यात लक्ष केंद्रित केले जाईल. आरोग्याबरोबरच शिक्षण क्षेत्रही मजबूत करण्याची गरज आहे.
Congress will contest elections under priyankas leadership in Up
महत्त्वाच्या बातम्या
- कॉँग्रेस दहशतवादाची जननी, नेहरूंचा रामावर विश्वास, इंदिराजींनी संतांवर गोळक्षबार केला तर सोनियांनी रामाचे अस्तित्व नाकारले, योगी आदित्यनाथांचा आरोप
- अफगणिस्थानचे माजी उपराष्ट्रपती सालेह यांच्या घणात सोन्याच्या वीटा, डॉलर्सच्या बंडलाह सापडले ४८ कोटी, तालीबानचा दावा
- किरण रिजीजू यांची धडाकेबाज कामगिरी पाहून सरन्यायाधिश म्हणाले, मला वाटले ते तर ऑक्सफोर्डमध्ये शिकलेत, नंतर समजले गावातील शाळेत घेतले शिक्षण
- इन्फोसिससारख्या कंपनीला देशद्रोही म्हणणे चुकीचे, पांचजन्यमधील लेखावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली नाराजी