विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केरळ मधून काँग्रेस साठी आनंदाची बातमी आली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने सत्ताधारी कम्युनिस्टांच्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट वर मात करून बहुतांश महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये बहुमता कडे वाटचाल सुरू केली.
केरळ मधून भाजप साठी सुद्धा समाधानकारक बातमी आली असून केरळची राजधानी तिरुअनंतपुरम महापालिकेत गेल्या 45 वर्षांची कम्युनिस्टांच्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटची सत्ता घालविण्यात यश मिळाले. तिरुअनंतपुरम महापालिकेत भाजपने 50 जागांच्या वरती मजल मारली. त्यामुळे महापालिकेत आता भाजपचा महापौर निवडून येऊ शकतो.
त्या पाठोपाठ पलक्कड नगर परिषदेत भाजपने बहुमत मिळविले असून 52 पैकी 28 जागा जिंकल्या. तिथे कम्युनिस्टांची पीछेहाट होऊन लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला फक्त 7 जागा जिंकता आल्या, तर काँग्रेसला 10 आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगला 4 जागा मिळाल्या.
काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने कोल्लम, कोची त्रिशूर आणि कन्नूर महापालिकांमध्ये बहुमत मिळविले. त्यामुळे केरळच्या शहरी भागात कम्युनिस्टांच्या लेफ्ट डिमाक्रॅटिक फ्रंटला मोठा धक्का बसला. पण तो धक्का तिथपर्यंतच थांबला नाही तर केरळच्या नगरपरिषदांमध्ये सुद्धा कम्युनिस्टांना धक्का सहन करावा लागला. केरळ मधील 86 नगरपरिषदांपैकी 55 नगरपरिषदांमध्ये काँग्रेस प्रणित युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटची सत्ता आली. कम्युनिस्टांना फक्त 28 नगर परिषदांची सत्ता मिळाली. अळापुळा, एर्नाकुलम मध्ये काँग्रेसला यश मिळाले, तर फक्त कोल्लम मध्ये कम्युनिस्टांना यश मिळाले.
Congress UDF Swept Kerala polls, BJP wins Thiruvananthapuram
महत्वाच्या बातम्या
- Bangladesh : बांगलादेशात सत्तापालटानंतर दीड वर्षानी निवडणुका; 12 फेब्रुवारीला मतदान; हसीना यांच्या पक्षावर बंदी
- हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरातून एकनाथ शिंदेंची विदर्भ + मराठवाड्यात राजकीय मुशाफिरी
- पवार काका – पुतण्यांनी एकत्र येण्यासाठी जोर लावलाच, तर होईल काय??
- मुंबई परिसरातल्या महापालिकांमध्ये महायुतीची सफल चर्चा; पण पुणे + पिंपरी चिंचवड मध्ये भाजपचा अजितदादांना धक्का!!