विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षित यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांनी स्वबळाची भाषा केली असली, तरी प्रत्यक्षात महाविकास आघाडी करून निवडणूक लढविण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, याची जाणीव दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आहे किंबहुना शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस तर, स्वबळाची देखील भाषा करायला तयार नाही त्यामुळे महाविकास आघाडीत रेटारेटी करून का होईना पण जागावाटप करावेच लागेल असे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. Congress trying to push shivsena UBT on second position in MVA seats sharing
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये बैठक घेऊन नंतर पत्रकार परिषदेत घेतली या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे प्रमुख नेते उपस्थित होते. पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेतले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार या पत्रकार परिषदेला हजर नव्हते. महाविकास आघाडीत काँग्रेसचे वर्चस्व राखण्याच्या दृष्टीने दिल्ली आणि मुंबईतून प्रयत्न होत आहेत.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपात आता काँग्रेसला मोठा वाटा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली असून त्यासाठी काँग्रेसचे नेते लोकसभा निवडणुकीतल्या परफॉर्मन्सचा हवाला देत आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हा एकमेव पक्ष असा आहे की जो डबल डिजिटमध्ये मध्ये जागा जिंकून चौथ्या क्रमांकावरून थेट पहिल्या क्रमांकावर आला आहे. काँग्रेसला हाताचा पंजा या चिन्हावर 13 जागा मिळाल्या. विशाल पाटील अपक्ष म्हणून सांगलीतून निवडून येऊन ते काँग्रेसला मिळाले. त्यामुळे आता लोकसभेत काँग्रेसच्या 14 जागा झाले आहेत. त्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9 जागांवर, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 8 जागांवर यश मिळाले आहे.
अर्थातच त्यामुळे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचा क्रम बदलला असून तिसऱ्या क्रमांकावर असलेली काँग्रेस लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्या क्रमांकावर आली असून शरद पवारांचा क्रमांक आता तिसरा झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात काँग्रेसचा वर्चस्व राखून इतर पक्षांनी जागा वाटून घ्याव्यात असा काँग्रेसचा आग्रह आहे. त्यामुळे ज्याची ताकद जिथे जास्त त्याला जागा वाटपात प्राधान्य या फॉर्मुलानुसार काँग्रेसला 100 ते 105, शिवसेनेला 90 ते 95 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 80 ते 85 जागा देण्याचे घाटत आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत आमदार आणि खासदार यांच्या संख्याबळाच्या आधारे शिवसेना थोरला भाऊ होता. शिवसेना फुटून देखील उद्धव ठाकरेंनी आपला पहिला क्रमांक गमावला नव्हता, पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीनंतर मात्र परिस्थिती पालटली आणि काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आल्याने तो पक्षाचा शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकावर ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याची बातमी आहे.
Congress trying to push shivsena UBT on second position in MVA seats sharing
महत्वाच्या बातम्या
- टीकेची झोड उठली तरी अजितदादांना सोडवेना सत्तेची वळचण; पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही अजितदादांची पाठराखण!!
- POCSO प्रकरणात येडियुरप्पा यांच्या अटकेला कर्नाटक उच्च न्यायालयाने दिली स्थगिती!
- रोहिंग्या, बांगलादेशींना परत पाठवणार नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही; मंत्री मंगल प्रभात लोढांची ग्वाही
- काश्मीरच्या आजादीची वकिली केल्याबद्दल अर्बन नक्षल अरुंधती रॉय वर UAPA अंतर्गत खटला चालणार!!