Thursday, 8 May 2025
  • Download App
    कर्नाटकात काँग्रेसची शपथविधीच्या शक्तिप्रदर्शनात आघाडी; पण ममता - ठाकरेंनी पंक्चर केली विरोधी ऐक्याची गाडी!!|Congress tried to show opposition unity in swearing in ceremony but Mamata banerjee and Uddhav Thackeray didn't attend

    कर्नाटकात काँग्रेसची शपथविधीच्या शक्तिप्रदर्शनात आघाडी; पण ममता – ठाकरेंनी पंक्चर केली विरोधी ऐक्याची गाडी!!

    विशेष प्रतिनिधी

    बेंगलोर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवून काँग्रेसने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या शपथविधीचे प्रचंड शक्तिप्रदर्शन केले. पण ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांनी शपथविधी समारंभाला गैरहजर राहून विरोधी ऐक्याची गाडी पंक्चर केली.Congress tried to show opposition unity in swearing in ceremony but Mamata banerjee and Uddhav Thackeray didn’t attend



    वास्तविक कर्नाटकातल्या शपथविधीचे निमंत्रण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतः फोन करून ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे आणि बाकीच्या महत्त्वाच्या विरोधी नेत्यांना दिले होते. पण ममता आणि उद्धव हे शपथविधीला उपस्थित राहिले नाहीत. या शपथविधी समारंभाला सोनिया गांधी हजर राहिल्या नाहीत. त्यांच्या ऐवजी राहुल आणि प्रियांका गांधी हे शपथविधी समारंभाला हजर राहिले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला, अभिनेते कमल हसन, ठाकरे गटाचे नेते खासदार अनिल देसाई, कम्युनिस्ट पार्टीचे नेते डी. राजा तसेच काँग्रेसचे सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हजर राहिले.

    पण शपथविधी समारंभाच्या निमित्ताने काँग्रेसने विरोधी पक्षांच्या ऐक्याचे जे शक्तिप्रदर्शन करून घेतले, त्या शक्तिप्रदर्शनात मात्र ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे हे उपस्थित नसल्याची चर्चा जास्त रंगली.

    Congress tried to show opposition unity in swearing in ceremony but Mamata banerjee and Uddhav Thackeray didn’t attend

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सरकारचा निर्णय, २१ विमानतळ १० मे पर्यंत बंद राहणार

    Harmony agreement : उद्योग अन् शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक सहकार्य सुनिश्चित करणारा सामंजस्य करार!

    Israel backs India : हवाई हल्ल्याविरुद्ध पाकिस्तानच्या समर्थनात चीन-तुर्किये; इस्रायलने भारताला पाठिंबा दिला