• Download App
    Congress Toolkit Exposed : महामारीच्या आडून काँग्रेसचा देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न, टूलकिटचा भाजपकडून पर्दाफाश । Congress Toolkit Exposed by BJP, Congress trying Defame Modi Government in Corona Crisis

    Congress Toolkit Leaked : महामारीच्या आडून काँग्रेसचा देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न, टूलकिटचा भाजपकडून पर्दाफाश

    Congress Toolkit Leaked :  कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे अवघा देश संकटात आहे. रुग्णांच्या संख्येत भरमसाट वाढ झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर सर्वात मोठा ताण आला आहे. दुसर्‍या लाटेमुळे ऑक्सिजनची कमतरता, रुग्णालयांमध्ये बेड आणि लसींचा तुटवडा असे प्रश्न आहेत. परंतु महामारीच्या आडून टोकाचे राजकारणही सुरू आहे. महामारीच्या या कठीण काळातही कॉंग्रेसने एक टूलकिट तयार केली असून या संकटाचा राजकारणासाठी कसा फायदा घ्यायचा हे यात नमूद करण्यात आले आहे. ही टूलकिटचा भंडाफोड काँग्रेसमधीलच एकाने केला आहे. यानंतर भाजपने शेअर करत काँग्रेसवर टीका केली आहे. Congress Toolkit Exposed by BJP, Congress trying Defame Modi Government in Corona Crisis


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे अवघा देश संकटात आहे. रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर सर्वात मोठा ताण आला आहे. दुसर्‍या लाटेमुळे ऑक्सिजनची कमतरता, रुग्णालयांमध्ये बेड आणि लसींचा तुटवडा असे प्रश्न आहेत. परंतु महामारीच्या आडून टोकाचे राजकारणही सुरू आहे. महामारीच्या या कठीण काळातही कॉंग्रेसने एक टूलकिट तयार केली असून या संकटाचा राजकारणासाठी कसा फायदा घ्यायचा हे यात नमूद करण्यात आले आहे. ही टूलकिटचा भंडाफोड काँग्रेसमधीलच एकाने केला आहे. यानंतर भाजपने शेअर करत काँग्रेसवर टीका केली आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत म्हटले की, महामारीच्या काळातही कॉंग्रेस टूलकिटद्वारे जनमानसात गैरसमत पसरवण्याचे काम करत आहे.

    देश कठीण परिस्थितीतून जात असताना काँग्रेस सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आली आहे. आता भाजपनेही पलटवार सुरू केला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत काँग्रेसची एक टूलकिट समोर ठेवली. संबित पात्रा यांनी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्यासाठी काँग्रेसने टूलकिट तयार केली आहे. संकटाच्या काळातही काँग्रेसकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

    ‘काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आला’

    पत्रकार परिषदेत पात्रा म्हणाले की, राहुल गांधी रोज जे ट्वीट करत होते, जे बोलत होते, तो दस्तऐवज आता समोर आला आहे. ते म्हणाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि अनेक वृत्तवाहिन्या जो अजेंडा राबवत आहेत, ते टूलकिट आता मिळाले आहे. सोशल मीडियामध्ये काँग्रेसचे एक टूलकिट राबवले जात आहे. ज्यात महामारीच्या काळात कशा प्रकारे राजकारण करायचे, याचे पद्धतशीर निर्देश आहेत. पात्रा म्हणाले की, जनतेमध्ये भ्रम पसरवून त्यांना आपला राजकीय स्वार्थ साधायचा आहे. ते म्हणाले की, आता काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे.

    पात्रा म्हणाले, ‘या टूलकिटमध्ये असे म्हटले आहे की, काही प्रकाशनांमध्ये मिसिंग मॅनेजमेंट आणि मिसिंग गव्हर्नमेंट छापा. टूलकिटमध्ये असेही म्हटले आहे की, वारंवार पत्र लिहायला लावा. याअंतर्गत कधी सोनिया गांधी, कधी राहुल गांधी तर कधी तथाकथित व्यक्तींकडून पत्र लिहून घ्या. या टूलकिटमध्ये असेही म्हटले आहे की, पत्र मधूनमधून लिहित राहायचे आहे आणि असेही सांगण्यात आले आहे की, कशा प्रकारे हे पत्र लिहिले जावे. टूलकिटमध्ये सांगण्यात आले आहे की, पीएम केअर्स फंडवरूनही विविध प्रश्न विचारायचे आहेत, आणि काँग्रेस तेच सर्व करत आहे. या टूलकिटच्या हिशेबाने मोदी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे.

    Congress Toolkit Exposed by BJP, Congress trying Defame Modi Government in Corona Crisis

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!