प्रतिनिधी
नवी दिल्ली – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात काँग्रेस प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढवेल, असे जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या होत्या. त्यांनी त्यावर तिखट प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या होत्या. पण आता दस्तुरखुद्द काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी नानांच्या “स्वबळा”ला आपले “बळ” दिले आहे. महाराष्ट्रात काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढविण्यास राहुल गांधी यांनी मंजूरी दिली आहे. congress to contest all elections in maharashtra on its own, says nana patole after meeting with rahul gandhi
नाना पटोले आणि राज्य प्रभारी एच. के. पाटील आज दुपारी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जाऊत्न त्यांच्याशी थेट चर्चा केली. या दोन्ही नेत्यांची राहुलजींसमवेत जवळपास दीड तास बैठक झाली. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींची माहिती दोन्ही नेत्यांनी राहुलजींना सविस्तर दिली.
या वेळी नाना पटोले यांनी काँग्रेसने स्वबळावर का निवडणूक लढवली पाहिजे, याबद्दल आपली भूमिका मांडली. महाराष्ट्रात काँग्रेसला काम करण्याची मोठी संधी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेस स्वबळावर लढल्यास फायदा होईल, असे नानांनी राहुल गांधींना पटवून दिले. त्यामुळे राहुल गांधी यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या कल्पनेस मंजुरी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
नाना पटोले यांनी काँग्रेसच्या स्वबळाची भाषा वापरल्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. ठाकरे यांनी तर लोक जोड्याने मारतील, अशी भाषा वापरली होती.
आज जरी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील हे नानांबरोबर राहुल गांधींना भेटले असले, तरी त्या आधी पाटलांनी अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या दोन मंत्र्यांबरोबर शरद पवारांची सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली होती. तेव्हा नाना पटोलेंना बरोबर नेणे या तिन्ही नेत्यांनी टाळले होते.
परंतु, तरीह देखील नाना पटोले आपल्या स्वबळाच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी आपली कल्पना राहुल गांधी यांना सांगितल्यावर त्यांनी देखील त्याला मंजूरी दिली आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
congress to contest all elections in maharashtra on its own, says nana patole after meeting with rahul gandhi
महत्त्वाच्या बातम्या
- इंडोनेशियात कोरोनाचा हाहाकार : भारत आणि ब्राझीलला मागे सोडून इंडोनेशिया बनला कोरोना महामारीचा नवा हॉटस्पॉट
- Free Vaccine For Everyone : 24 दिवसांत लसीकरणाचा आकडा 30 वरून 40 कोटींवर, आरोग्यमंत्री मंडाविया यांचे ट्विट
- Pegasus Spying : आयटी मंत्री अश्विनी वैष्णव लोकसभेत म्हणाले- लीक झालेल्या डेटाचा हेरगिरीशी संबंध नाही, आरोप निराधार!
- कळव्यात दरड कोसळून 5 जण ठार, ढिगाऱ्याखालून 2 जणांची सुटका, रेस्क्यू ऑपरेशन सुरू
- पाकिस्तानी षडयंत्राचा पर्दाफाश : जिथे भारतीय पत्रकार दानिशची हत्या झाली, तेथे पाकिस्तान आणि तालिबानचे झेंडे एकत्र फडकतात