वृत्तसंस्था
भोपाळ : भारतातली तथाकथित लिबरल वृत्तसंस्था न्यूज क्लिक मधल्या चिनी हवाला पैशाचे काँग्रेसने समर्थन केले, पण त्याच वेळी पीएम केअर फंडामध्ये चिनी कंपनीने दिलेल्या डोनेशनवर सवाल उपस्थित केला. Congress supports Chinese hawala money in News Click
काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी न्यूज क्लिक वृत्तसंस्थेतील संस्थेत चीन मधून हवाला मार्गे आलेले 38 कोटी रुपये गुंतविल्याचे समर्थन केले. कोणा एका भारतीय वृत्तसंस्थेत चिनी कंपनीने पैसा गुंतविला, तर तो देशद्रोह होतो. पण पीएम केअर फंड मध्ये चिनी कंपनीने डोनेशन दिले, तर तो देशद्रोह होत नाही, ते देशप्रेम आहे.
हा सरकारचा दुटप्पी व्यवहार झाला, असे अजब वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केले. या देशात प्रत्येकाला अविष्कार स्वातंत्र्य आहे. त्यानुसार कोणी बोलत असेल अथवा लिहित असेल, तर त्याच्यावर प्रतिबंध घालता येणार नाही. सरकारने न्यूज क्लिक वृत्तसंस्थेवर घातलेले छापे अयोग्य आहेत, अशी टीकाही दिग्विजय सिंह यांनी केली.
मात्र न्यूज क्लिक वृत्तसंस्थेत गुंतवलेला 38 कोटी रुपये एवढा निधी चीनमधून हवालामार्फत आला होता, ही रक्कम गुंतविल्याचे न्यूज क्लिकने जाहीर केले नव्हते, तर ईडीच्या तपासातून त्या 38 कोटी रुपयांचे चिनी हवाला कनेक्शन उघड झाले, तर पीएम केअरला दिलेले डोनेशन हे अधिकृत पावती घेऊन दिले होते, हे तथ्य मात्र दिग्विजय सिंह यांनी लपविले.
Congress supports Chinese hawala money in News Click
महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तान, स्वरा भास्कर, मिया खलिफा, गौहर खान हमासच्या समर्थनात; एकच भाषा सर्वांच्या तोंडात!!
- राघव चढ्ढा यांना न्यायालयाकडून झटका,”सरकारी घरावर ताबा ठेवण्याचा अधिकार नाही”
- Cricket World Cup : भारत-पाकिस्तान सामन्यासाठी खास ‘वंदे भारत’ ट्रेन धावणार
- भारतीयांनी ऑस्ट्रेलियाला फिरकी बोटांवर नाचवले; 200 च्या आत गुंडाळले!!