वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचा गड मैनपुरी जिल्ह्यातील करहल मतदारसंघातून काँग्रेसने ज्ञानवती यादव उमेदवारी दिली होती. परंतु आज काँग्रेस हायकमांडने त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे.Congress supports Akhilesh Yadav in Karhal constituency without asking; The ticket of the Congress candidate was withdrawn by the High Command
करहल या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने केंद्रीय कायदे राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.
या दोन दिग्गज नेत्यांच्या टकरीत काँग्रेसने ज्ञानवती यादव यांना करहल मधून तिकीट देऊन उतरवले होते. परंतु आता काँग्रेस हायकमांडने त्यांना दिलेले तिकीट मागे घेतले असून येथे काँग्रेसचा उमेदवार नसेल. त्यामुळे एक प्रकारे काँग्रेसने अखिलेश यादव यांना पाठिंबा जाहीर केल्याचे मानण्यात येत आहे.
प्रत्यक्षात अखिलेश यादव यांनी काँग्रेसकडे पाठिंबा मागितलेला नाही तसेच काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रयत्न देखील केले नाहीत. तरीही काँग्रेस हायकमांडने अखिलेश यादव यांना न मागताच पाठिंबा दिल्याचे मानण्यात येत आहे. आता मध्ये अखिलेश यादव विरुद्ध एस. पी. सिंह बघेल यांच्यात खऱ्या अर्थाने लढत रंगणार आहे.
Congress supports Akhilesh Yadav in Karhal constituency without asking; The ticket of the Congress candidate was withdrawn by the High Command
महत्त्वाच्या बातम्या
- अर्थसंकल्प 2022 – 23 : पर्वतमाला योजनेतून देशाच्या दुर्लक्षित पर्वतीय सीमावर्ती राज्यांमध्ये पोहोचणार विकासाची गंगा!!
- राहुल गांधींचे गणित कच्चे त्यामुळे त्यांना सगळीकडे 0 दिसते; पियुष गोयलांचे टीकास्त्र
- Budget 2022 : अर्थसंकल्पात मोठी घोषणा, पोस्ट ऑफिसला जोडणार कोअर बँकिंग, वाचा काय होणार फायदे
- राजकारण्यांची खुशामतखोरी कशाला? खाम नदी प्रकल्पाला माझे नाव नको… भाजप राष्ट्रीय सचिव विजया रहाटकरांनी औरंगाबाद आयुक्तांना लिहिले खरमरीत पत्र