• Download App
    Congress ट्रम्प आठ वेळा बोलल्याचे काँग्रेसच्या प्रवक्त्यांना दिसले, पण पाकिस्तानचे याचनाकर्ते पंतप्रधान पाहायचे म्हटल्याबरोबर त्यांचे डोळे फुटले!!

    Congress : ट्रम्प आठ वेळा बोलल्याचे काँग्रेसच्या प्रवक्त्यांना दिसले, पण पाकिस्तानचे याचनाकर्ते पंतप्रधान पाहायचे म्हटल्याबरोबर त्यांचे डोळे फुटले!!

    भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेने ceasefire घडवले असे ट्रम्प आठ वेळा म्हणाल्याचे काँग्रेसच्या प्रवक्त्यांना दिसले. त्यांनी मोदी सरकारला वारंवार टोचले. पण पाकिस्तानचे याचनाकर्ते पंतप्रधान पाहायचे म्हटल्याबरोबर काँग्रेसच्या प्रवक्त्यांचे डोळे फुटले!! काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश, पवन खेडा आणि माजी खासदार उदित राज यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमधून हे between the lines समोर आले.

    भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेने ceasefire घडवून आणले अन्यथा फार मोठे युद्ध भडकले असते, असे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत, सौदी अरेबियात आणि कतारमध्ये केले. त्याची आठवण जयराम रमेश यांनी वारंवार मोदी सरकारला करून दिली. पंतप्रधान मोदी अजूनही ट्रम्प यांच्या वक्तव्यावर काही बोलले नाहीत. त्यांनी पुढे येऊन बोलले पाहिजे, असे जयराम रमेश म्हणाले काँग्रेसच्या दैनंदिन पत्रकार परिषदेत पवन खेडा यांनी देखील हाच मुद्दा वारंवार लावून धरला. मोदी कधीच विरोधी पक्षांशी बोलत नाहीत. सर्वपक्षीय बैठकीला हजर राहत नाहीत. अमेरिकेचे अध्यक्ष बोलले, तरी त्यांना प्रत्युत्तर देत नाहीत, असा दावा पवन खेडा यांनी वारंवार केला. ‌खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेते खासदार शशी थरूर यांच्यावर उदित राज यांनी तोंडसुख घेतले. शशी थरूर हे काँग्रेसचे खासदार असूनही भाजपचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत जगभर फिरत आहेत, अशी टीका उदित राज यांनी केली.



    जयराम रमेश, पवन खेडा आणि उदित राज या काँग्रेसच्या प्रवक्त्यांना डोनाल्ड ट्रम्प हे आठ वेळा बोलल्याचे दिसले. डोनाल्ड ट्रम्प यांची वक्तव्ये अमेरिकन प्रशासनाने मोजली नाहीत, पण ती या तिघांनी मोजली. कारण त्यांना ट्रम्प यांच्या वक्तव्यांपेक्षा मोदी सरकारला टोचण्यामध्ये जास्त intrest होता. ती खाज त्यांनी भागवून घेतली.

    – पाकिस्तानशी बोला हो, शहाबाज शरीफचा टाहो

    पण ट्रम्प यांची वक्तव्य मोजणाऱ्या काँग्रेसच्या तिन्ही प्रवक्त्यांना पाकिस्तानचा याचनाकर्ता पंतप्रधान दिसला नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ तुर्कस्तान आणि अझरबैजान या दोन देशांच्या दौऱ्यावर गेले. तिथे त्यांनी वेगवेगळ्या वेळी एकच वक्तव्य केले. पाकिस्तान भारताशी चर्चा करायला तयार आहे. भारताने पाकिस्तानशी चर्चा करायची तयारी दाखवावी. आम्ही त्यांच्याशी प्रत्येक मुद्द्यावर बोलू, पण भारताने आम्हाला प्रतिसाद द्यावा, अशी याचना शहाबाज शरीफ यांनी तुर्कस्तान आणि अझरबैजान या दोन्ही देशांमधून केली. अझरबैजान मध्ये पाकिस्तान, तुर्कस्तान आणि अझरबैजान अशी त्रिराष्ट्रीय परिषद देखील झाली. या परिषदेत देखील शहाबाज शरीफ यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्याच चर्चेचे तुणतुणे वाजविले. भारताने पाकिस्तानशी चर्चा करायची तयारी दाखवावी, अशी याचना पुन्हा केली. त्यासाठी त्यांनी काश्मीर प्रश्न, व्यापार वगैरे नेहमीचेच मुद्दे पुढे केले. त्यात त्यांनी सिंधू पाणी वाटपाचा मुद्दा देखील वाढवून सांगितला.

    – पाकिस्तानचा तीन तिघाडा

    एरवी दहशतवाराची फॅक्टरी चालवताना पाकिस्तानने किंवा त्यांच्या राज्यकर्त्यांनी कधीही भारतापुढे चर्चेची एवढ्या मोठ्या प्रमाणावर चर्चेची याचना केली नव्हती. भारत पाकिस्तानशी बोलायलाच तयार नाही. बोलायचे असेल, तर फक्त दहशतवाद संपविणे आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारताला परत देऊन टाकले. या दोनच मुद्द्यांवर पाकिस्तानशी चर्चा होईल, असे भारताने वारंवार स्पष्ट केले, तरी देखील पाकिस्तानी पंतप्रधान भारताकडे चर्चेची याचना करीत राहिले. पाकिस्तान मधून तर त्यांनी ती याचना केलीच, पण तुर्कस्तान आणि अझरबैजान मध्ऊ जाऊनही पुन्हा तीच याचना रिपीट केली.

    पण हे सगळे काँग्रेसच्या तिन्ही प्रवक्त्यांना दिसले नाही. पाकिस्तानचे याचनाकर्ते पंतप्रधान पाहायचे म्हटल्याबरोबर या तिन्ही प्रवक्त्यांच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. शहाबाज शरीफ यांच्या मागणीवर या तिघांनी एक शब्दही उच्चारला नाही. किंवा मोदी सरकारने चर्चेच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतल्याचे दोन कौतुकाचे शब्दही तोंडातून काढले नाहीत.

    Congress spokesman can’t see imploring Pakistan prime minister in front of India

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार