विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात सध्या लखीमपुर हिंसाचाराचा घटना गाजत असला तरी काँग्रेस पक्षाने मात्र त्या घटनेत स्वतःला वाहून जाऊ देऊ नये, असा परखड सल्ला ज्येष्ठ पत्रकार विनोद शर्मा यांनी काँग्रेसला दिला आहे. हिंदुस्तान टाइम्स मध्ये लिहिलेल्या विशेष लेखामध्ये त्यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीविषयी आपली मते मांडली आहेत. Congress should not allow itself to be carried away in Lakhimpur incident … !!; Advice from journalist Vinod Sharma
लखीमपूर मध्ये घडलेल्या हिंसाचाराचा निषेधच केला पाहिजे. यात कोणतीही शंका नाही. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी तो मुद्दा सुरूवातीलाच उचलून अतिशय योग्य वेळ साधली. काँग्रेससाठी त्याचा राजकीय लाभ निश्चित होईल. परंतु, काँग्रेसने तेवढ्यापुरतेच मर्यादित राहता कामा नये आणि त्याच मुद्द्यांमध्ये स्वतःला गुरफटून घेऊ नये, असे मत विनोद शर्मा यांनी या लेखात मांडले आहे.
राजकारणात अचूक टायमिंग साधणे ही मोठी कला आहे. लखीमपूर हिंसाचाराच्या निमित्ताने प्रियांका गांधी यांनी हे राजकीय टाइमिंग अचूक साधले असले, तरी काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी तेवढे पुरेसे नाही. काँग्रेसमध्ये सध्या अनेक विसंगती तयार झाल्या आहेत. त्या विसंगतींवर मात करण्यासाठी काही मूलभूत बदल करण्याची गरज आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाने पक्षात काही संरचनात्मक बदल केले पाहिजेत. खरेतर संरचनात्मक बदल करण्याच्या मुद्द्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण लखीमपूरची घटना निषेधार्ह असली तरी ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे हेही लक्षात घेतले पाहिजे, याकडे विनोद शर्मा यांनी आपल्या लेखातून लक्ष वेधले आहे.
काँग्रेसमधल्या संरचनात्मक बदलांमध्ये लोकशाही प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली पाहिजे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्वाविषयीचा विश्वास वाढू शकतो. काँग्रेसमध्ये संरचनात्मक बदल केले नाही तर त्याला फारसे राजकीय पक्ष म्हणून महत्त्व उरणार नाही, असा इशारा देखील विनोद शर्मा यांनी या लेखात दिला आहे.
Congress should not allow itself to be carried away in Lakhimpur incident … !!; Advice from journalist Vinod Sharma
महत्त्वाच्या बातम्या
- जिंदगी ना मिलेगी दोबारा सिनेमामुळे स्पेनच्या टुरिझम व्यवसायात झाली होती 32% नी वाढ ?
- दुर्गा सन्मान: द फोकस इंडियाच्या वतीने पहिला ‘दुर्गा सन्मान’ पुरस्कार सोहळा थाटामाटात संपन्न ; प्रशांत दामलेंनी द फोकस इंडियाला शुभेच्छा देत केले कौतुक
- चोर समजून २६ वर्षीय तरुणाची हत्या; तीन आरोपींना अटक
- आईस्क्रीम खाणे आता महागणार!, १८ टक्के जीएसटी लागू