• Download App
    'काँग्रेसने इम्रान खानशी युती करून पाकिस्तानात सरकार स्थापन करावे', मुख्यमंत्री हिमंता संतापले Congress should form government in Pakistan by forming alliance with Imran Khan CM Himanta angry

    ‘काँग्रेसने इम्रान खानशी युती करून पाकिस्तानात सरकार स्थापन करावे’, मुख्यमंत्री हिमंता संतापले

    (संग्रहित छायाचित्र)

    काँग्रेसच्या ठरावात दहशतवादावर चर्चा नाही, हमासची चर्चा नाही केवळ पॅलेस्टाईनबद्दल बोललं गेल्याचंही म्हणाले.

     विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : इस्रायल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये मागील काही दिवसांपासून भीषण युद्ध सुरू आहे. इस्रायलवर हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलचे संरक्षण दल हमासच्या  विविध ठिकाणांवर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. मात्र या युद्धापासून हजारो किलोमीटर दूर भारतात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. Congress should form government in Pakistan by forming alliance with Imran Khan CM Himanta angry

    काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीत पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ ठराव आणला गेल्यापासून या मुद्द्यावरून देशाचे राजकारण दोन गटात विभागले गेले आहे. या प्रस्तावानंतर काँग्रेस सातत्याने टीकेचे धनी होताना दिसत आहे. शिवाय भाजपाही काँग्रेसवर निशाणा साधत आहे.

    आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणे ही काँग्रेस पक्षाची जबाबदारी होती असे ते म्हणाले. हमासने मुले आणि महिलांना ओलीस ठेवल्याचा त्यांनी निषेध केला पाहिजे होता.  असेही ते म्हणाले. पण काँग्रेसच्या ठरावात दहशतवादावर चर्चा नाही, हमासची चर्चा नाही, माता-मुलांना ओलीस ठेवल्याची चर्चा नाही. असेही त्यांनी सांगितले.

    याशिवाय ते म्हणाले की, आजही 150 लोक ओलीस आहेत, त्याबद्दल काही मुद्दा उपस्थित करण्यात आला नाही. ते म्हणाले की केवळ पॅलेस्टाईनबद्दल बोलत आहेत. असेच विधान फक्त पाकिस्तानचे आहे. त्यामुळेच कधी-कधी हा प्रश्न मनात येतो की  काँग्रेस पक्षाला सरकार भारतात बनवायचे की पाकिस्तानात? तुम्ही मला विचाराल तर काँग्रेसने तालिबानशी युती करून पाकिस्तानात आपले सरकार बनवावे, अफगाणिस्तान नाही तर इम्रान खान किंवा शाहबाज शरीफ यांच्याशी युती करून सरकार बनवावे.

    Congress should form government in Pakistan by forming alliance with Imran Khan CM Himanta angry

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज