• Download App
    सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टवर टीका करणाऱ्या कॉंग्रेसच्या राजस्थान सरकारकडून आमदारांसाठी आलिशान फ्लॅटची उभारणी सुरू|Congress Rajasthan government starts construction of luxurious flats for MLAs criticizing Central Vista project

    सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टवर टीका करणाऱ्या कॉंग्रेसच्या राजस्थान सरकारकडून आमदारांसाठी आलिशान फ्लॅटची उभारणी सुरू

    भविष्याचा विचार करून मोदी सरकारकडून उभारल्या जात असलेल्या सेंट्रल व्हिसा या प्रकल्पावर कॉँग्रेस टीका करत आहे. मात्र, याच कॉँग्रेसचे राजस्थानमधील सरकार तब्बल २६६ कोटी रुपये खर्च करून जयपूरमध्ये खासदारांसाठी आलिशान फ्लॅटची उभारणी करत आहे.Congress Rajasthan government starts construction of luxurious flats for MLAs criticizing Central Vista project


    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : भविष्याचा विचार करून मोदी सरकारकडून उभारल्या जात असलेल्या सेंट्रल व्हिसा या प्रकल्पावर कॉँग्रेस टीका करत आहे. मात्र, याच कॉँग्रेसचे राजस्थानमधील सरकार तब्बल २६६ कोटी रुपये खर्च करून जयपूरमध्ये खासदारांसाठी आलिशान फ्लॅटची उभारणी करत आहे.

    सध्या देशात कोरोना महामारीचे संकट आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची उभारणी सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून विशेषत: कॉँग्रेसकडून मोदी सरकारवर टीका सुरू आहे.



    सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी वापरला जाणारा निधी कोरोनावर उपाययोजेसाठी वापरावा जावा अशी त्यांची मागणी आहे. मात्र, कॉँग्रेसच्याच राजस्थानातील अशोक गेहलोत सरकारकडून कोरोनाच्या संकटाच्या काळात आमदारांसाठी आलिशान फ्लॅट उभारणीची तयारी सुरू आहे.

    जयपूर येथील ज्योती नगर परिसरात विधानसभा सभागृह आहे. याच परिसरात आमदारांसाठी आलिशान फ्लॅट उभारणीची तयारी सुरू करण्यात आली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यासाठी २६६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे

    मे २०२० मध्येच या प्रकल्पाला सुरूवात झाली आहे. राजस्थान हाऊसींग बोर्डकडून या प्रलपाची उभारणी होत आहे. प्रत्येक फ्लॅट हा सुमारे ३२०० चोरस फुटाचा असून त्यामध्ये चार बेडरूम असणार आहे.

    जयपूर डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने सुरूवातीला १७६ फ्लॅटस उभारणीस मंजुरी दिली होती. मात्र, राजस्थान हाऊसींग बोर्डाने १६० फ्लॅटला परवानगी दिली होती.

    सेंट्रल व्हिस्ट प्रकल्पावर एका बाजुला टीका करताना राजस्थानमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारला जात आहे. याबाबत राजस्थान प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंग डोटसरार यांनी विचारले असता ते म्हणाले, सर्व काही कायद्याप्रमाणे होत आहे.

    मात्र, कॉँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष मोदी सरकारवर सेंट्रल व्हिस्टाच्या कामावरून टीकेचे प्रहार कात असताना राजस्थानमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून उभारल्या जात असलेल्या या प्रकल्पाबाबत कोणी बोलायला तयार नाही.

    कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहूल गांधी यांनी सेंट्रल व्हिस्टा प्रल्प म्हणजे क्रिमीनल वेस्टेज असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांच्या पक्षाच्या सरकारने राजस्थानमध्ये सुरू केलेल्या उधळपट्टीबाबत काहीही बोलण्यास तयार नाही.

    Congress Rajasthan government starts construction of luxurious flats for MLAs criticizing Central Vista project

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य