• Download App
    सार्वजनिक डिबेटचे शशी थरूर यांचे आव्हान मल्लिकार्जुन खर्गेंनी राजकीय खुबीने टाळलेCongress presidential election : Mallikarjun Kharge deflects Shashi Tharoor's challenge of public debate to BJP and RSS

    सार्वजनिक डिबेटचे शशी थरूर यांचे आव्हान मल्लिकार्जुन खर्गेंनी राजकीय खुबीने टाळले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे हे दोनच उमेदवार उरलेले असताना निवडणुकीत हळूहळू रंग भरायला लागले आहेत. एरवी रूक्ष किंवा फार्स वाटणारी ही निवडणूक इंटरेस्टिंग वळणावर पोचलेली दिसत आहे कारण शशी थरूर यांनी दिलेले सार्वजनिक डिबेटचे आव्हान मल्लिकार्जुन खर्गे यांनी राजकीय चतुर्य वापरून टाळले आहे. Congress presidential election : Mallikarjun Kharge deflects Shashi Tharoor’s challenge of public debate to BJP and RSS

    त्याचे झाले असे : शशी धरून यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापेक्षा दोन दिवस आधीच वैयक्तिक पातळीवर प्रचाराला सुरुवात करून प्रत्यक्ष दौराही सुरू केला. या दौऱ्यातल्या पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये अंतर्गत निवडणूक ही मैत्रीपूर्ण लढत आहे, असे स्पष्ट केले. पण त्याचवेळी थरूर यांनी युरोपियन देशात किंवा अमेरिकेत चालत असलेल्या इलेक्शन डिबेटचा हवाला दिला. अशा स्वरूपाची सार्वजनिक डिबेट जनतेसमोर आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर झाली तर लोकशाहीच्या दृष्टीने त्यांचे प्रबोधन होईल. तसे डिबेट मल्लिकार्जुन खरे यांनी आपल्याशी करावे, असे आवाहन त्यांना दिले. मात्र असे आव्हान येतात मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपले राजकीय चातुर्य वापरून आपण दोघे मिळून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सार्वजनिक डिबेट करू असे सांगितले. एक प्रकारे थरूर यांच्यासमोर यांचे समोरासमोर डिबेट करण्याचे आव्हान त्यांनी संघ आणि भाजपवर डिफ्लेक्ट केले.



     थरूर – खर्गे नेतृत्व भेद

    थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे या दोघांमध्ये फक्त वयाचा फरक नसून नेतृत्वाच्या राजकीय स्टाईलचा देखील फरक आहे, हे यातून स्पष्ट झाले. थरूर यांची नेतृत्वाची धाटणी अर्थातच आंतरराष्ट्रीय पातळीवरची आहे. कारण मूळातच त्यांचे कामच आंतरराष्ट्रीय पातळीवरचे होते. थरूर यांनी यापूर्वी संयुक्त राष्ट्र संघाच्या सरचिटणीस पदाची निवडणूक लढवली आहे. ते संयुक्त राष्ट्र संघात भारताचे कायमचे प्रतिनिधी होते. त्यामुळे इंटरनॅशनल डिबेट्स मध्ये भाग घेणे हा त्यांच्या दृष्टीने सवयीचा भाग होता.

    त्या उलट मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसमधल्या राजकारणात मुरलेले नेते आहेत. सार्वजनिक ठिकाणी पक्षांतर्गत बाबींवर डिबेट करणे “पॉलिटिकल इन्करेक्ट” ठरू शकते याची पक्की जाणीव त्यांना आहे. त्यातच ते आता काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक लढवत असल्याने अशा डिबेट मधून एखादा वाग्बाण गांधी परिवाराच्या दिशेने सुटला तर त्याची काय किंमत मोजावी लागू शकते??, याचीही पक्की जाण त्यांना आहे. त्यामुळे त्यांनी अतिशय खुबीने आपण दोघे मिळून संघ भाजपशी डिबेट करू असे सांगून शशी थरूर यांचे सार्वजनिक डिबेटच्या आव्हान टाळले आहे.

    Congress presidential election : Mallikarjun Kharge deflects Shashi Tharoor’s challenge of public debate to BJP and RSS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!