प्रियांक खर्गे हे कर्नाटक सरकारचे मंत्री देखील आहेत.
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : तामिळनाडू द्रमुक सरकारचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ सुरूच आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म नष्ट करण्याबाबत बोलले होते, त्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका होत आहे. आता कर्नाटक सरकारचे मंत्री आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांनी उदयनिधी स्टॅलिन यांना पाठिंबा दिला आहे. Congress President Khargens Son Priyank Kharge support for Udayanidhi Stalin
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रियांक खर्गे म्हणाले की, ‘कोणताही धर्म जो विषमतेला प्रोत्साहन देतो आणि माणूस म्हणून सन्मानाचे उल्लंघन करतो तो धर्म नाही. माझ्या मते… कोणताही धर्म जो समान अधिकार देत नाही किंवा माणसांना माणसांसारखी वागणूक देत नाही, तो एक रोग आहे.
द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, ‘काही गोष्टी आहेत, त्यांचा विरोध करणे पुरेसे नाही, त्यांना नष्ट करायचे आहे. डास, डेंग्यू ताप, मलेरिया, कोरोना या अशा गोष्टी आहेत ज्यांना आपण नुसता विरोध करू शकत नाही तर आपल्याला त्यांचा नायनाट करायचा आहे. सनातनही असेच आहे. उदयनिधी स्टॅलिन यांच्या या विधानानंतर जोरदार टीका सुरू झाली. भाजपानेही स्टॅलिनची खरडपट्टी काढली आणि विरोधी आघाडीवर टीका केली.
Congress President Khargens Son Priyank Kharge support for Udayanidhi Stalin
महत्वाच्या बातम्या
- भारताची संरक्षण निर्यात 6 वर्षांत 10 पटींनी वाढली, 80 देशांना 16 हजार कोटींची शस्त्र विक्री
- PM मोदी म्हणाले- देशात पूर्वी एक अब्ज उपाशी होते, आता दोन अब्ज कुशल हात; 2047 पर्यंत भारत विकसित देश होणार
- मध्यावधी नाहीच, निवडणूकही लांबणीवर टाकणार नाही; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी फेटाळले विरोधकांचे दावे
- Maratha Reservation :”…म्हणजे याचाच अर्थ मराठा आरक्षणाला शरद पवार यांचा पाठिंबा नाही” भाजपाने साधला निशाणा!