विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 99 खासदार निवडून आले तरी काँग्रेसला लोकसभेच्या विरोधी पक्षनेता ठरवता येईना. विस्तारित कार्यकारिणीने तसा ठराव संमत करून देखील राहुल गांधींचा निर्णयच अजून होईना, पण एकीकडे काँग्रेसमध्ये ही अवस्था असताना दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मात्र केंद्रातले मोदी सरकार अल्पमतातले आहे. त्यामुळे अस्थिर आहे, असा दावा केला.Congress of 99 MPs could not appoint Leader of Opposition; But Kharge says, Modi government is unstable and minority!!
या “अस्थिर” सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी शपथ घेऊन आपला पहिला परदेश दौरा केला. ते प्रगत राष्ट्रांच्या जी 7 संघटनेच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी इटली मधल्या आपुलिया शहरात गेले. तिथे त्यांनी प्रगत राष्ट्रांच्या नेत्यांशी चर्चा केली. भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान “मेक इन इंडिया” या संकल्पनेवर भर देणारे संरक्षण विषयक विस्तार करार केले.
एकीकडे मोदी इटलीतल्या वेगवेगळ्या असाइनमेंट वर असताना दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मात्र मोदी सरकार अल्पमतात आणि म्हणून अस्थिर असल्याचा दावा केला. मोदींना सरकार बनविण्याचा जनमताचा कौल नाही, तरी देखील त्यांनी सरकार बनविले. ते कसे चालेल हे आम्हाला माहिती नाही. ते अल्पमतातले सरकार आहे. आम्ही त्यांना सहकार्य करू. परंतु, मोदींना विरोधकांचे सहकार्य घेण्याची सवय नाही. त्यामुळे त्यामुळे मोदींचे सरकार पुढे किती दिवस टिकेल??, हे माहिती नाही असा टोला खर्गे यांनी हाणला.
एकीकडे मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारवर टोलेबाजी केली असली तरी प्रत्यक्षात काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत 99 खासदार निवडून आणूनही त्यांना अजून विरोधी पक्ष नेता नेमता आलेला नाही. राहुल गांधींनी लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी स्वीकारली असा ठराव विस्तारित काँग्रेस कार्यकारिणीने करून आता 1 आठवडा उलटून गेला. परंतु राहुल गांधींचा अद्याप निर्णय झालेला नाही. राहुल गांधी दरम्यानच्या काळात अमेठी, रायबरेली आणि वायनाड या तिन्ही मतदारसंघांचा दौरा करून आले. राहुल गांधी रायबरेली मतदारसंघ सोडणार की वायनाड सोडणार यावर माध्यमांमध्ये चर्चा झाली. त्याला राहुल गांधींनी खतपाणी घातले. राहुल गांधींनी वायनाड सोडले तर तिथून प्रियांका गांधींना पोटनिवडणुकीसाठी उभे करण्याचे काँग्रेसमध्ये घाटत आहे.
या सगळ्या राजकीय हालचाली काँग्रेसमध्ये सुरू असल्या तरी प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर विरोधी पक्षनेता म्हणून बसायला राहुल गांधी तयार नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे. राहुल गांधी विरोधी पक्षनेते होणार नसतील, तर काँग्रेस मधून त्या पदासाठी कोणाची लॉटरी लागणार??, याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली असून त्यामध्ये मनीष तिवारी, के. सी. वेणूगोपाल, गौरव गोगई वगैरे नेत्यांची नावे समोर आली आहेत. परंतु, राहुल गांधींचा निर्णय प्रलंबित असल्याचेच यातून अधोरेखित होते.
Congress of 99 MPs could not appoint Leader of Opposition; But Kharge says, Modi government is unstable and minority!!
महत्वाच्या बातम्या
- बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चिनी नागरिकावर EDची कारवाई, १३ कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त!
- NEET वादात कोचिंग सेंटर्सनी ओतले तेल! कमी अभ्यासक्रम आणि सोप्या परीक्षेमुळे त्यांच्या नफ्यावर होतो थेट परिणाम
- PM मोदी इटली दौऱ्यावर रवाना, G7 शिखर परिषदेत सहभागी होणार!
- लोकसभा निवडणूक संपताच भाजपा विधानसभेसाठी झाली सक्रिय!