• Download App
    कॉँग्रेसच्या खासदार भाजप उमेदवारांच्या प्रचारात सक्रीय|Congress MP active in campaigning for BJP candidates

    कॉँग्रेसच्या खासदार भाजप उमेदवारांच्या प्रचारात सक्रीय

    विशेष प्रतिनिधी

    अमृतसर : कॉँग्रेसच्या खासदार आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रीय झाल्याचे वाचून आश्चर्य वाटले ना? पण हे पंजाबमध्ये घडत आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परनित कौर कॉँग्रेसच्या खासदार असूनही भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रीय आहेत.Congress MP active in campaigning for BJP candidates

    पंजाबमध्ये येत्या २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. कॅप्टन अमरिंद सिंग यांनी काही महिन्यांपूर्वीच पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पंजाब लोक काँग्रेस या नावाचा नवा पक्ष स्थापन केला. यानंतर त्यांनी आपल्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक देखील लढवण्याची घोषणा केली. या पक्षाने भाजपासोबत युती केली आहे. आता अमरिंदर सिंग हे भाजपा आणि पंजाब लोक काँग्रेस यांचे संयुक्त उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत.



    कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी जरी काँग्रेसचा राजीनामा दिला असला, तरी त्यांच्या पत्नी परनीत कौर या मात्र अजूनही काँग्रेसच्या अधिकृत खासदार आहेत. त्याही पतियाला लोकसभा मतदारसंघातूनच त्या खासदार झालेल्या आहेत. अमरिंद सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर परनीत कौर यांनी स्पष्ट केलेहोते की आपण आपल्या पतीच्या पाठिशी राहणार आहोत. पण हे सांगताना त्यांनी काँग्रेसला मात्र सोडचिठ्ठी दिलेली नाही.

    सध्या कॅप्टन अमरिंदर सिंग आपल्या प्रचारासाठी पतियाला विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. परनीत कौर देखील त्यांच्यासोबत त्यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे आपल्याच पक्षाच्या लोकसभा मतदारसंघात परनीत कौर विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्थात त्यांचे पती कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा प्रचार करताना दिसू लागल्या आहेत.

    Congress MP active in campaigning for BJP candidates

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज