• Download App
    कॉँग्रेस दहशतवादाची जननी, नेहरूंचा रामावर विश्वास, इंदिराजींनी संतांवर गोळक्षबार केला तर सोनियांनी रामाचे अस्तित्व नाकारले, योगी आदित्यनाथांचा आरोप|Congress mother of terrorism, Indiraji lashes out at saints, Sonia denies Rama's existence, accuses Yogi Adityanath

    काँग्रेस दहशतवादाची जननी, नेहरूंचा रामावर विश्वास, इंदिराजींनी संतांवर गोळीबार केला तर सोनियांनी रामाचे अस्तित्व नाकारले, योगी आदित्यनाथांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : काँग्रेस दहशतवादाची जननी असून हा देश आधी इंग्रजांनी आणि नंतर काँग्रेसने लुटला. नेहरूंचा रामावर विश्वास नव्हता. इंदिराजींनी संतांवर गोळीबार केला आणि सोनिया गांधींनी रामाचे अस्तित्व नाकारले, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केल आहे.Congress mother of terrorism, Indiraji lashes out at saints, Sonia denies Rama’s existence, accuses Yogi Adityanath

    योगी आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेस ही भारतातील दहशतवादाची जननी आहे आणि ते भगवान राम यांच्यावरील लोकांच्या विश्वासाचा अपमान करतात. देशाला दुखावणाऱ्या लोकांना देशवासियांना सहन करण्याची गरज नाही. काँग्रेस देशातील लोकांना रोग देतंय. तसेच ते प्रभू रामावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा अपमान करून माफियांना आश्रय देते.



    तर याउलट भाजप नागरिकांना बरे करतो. आम्ही प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करतो आणि माफियांना त्यांची जागा दाखवतोय. भाजप आहे तिथे प्रत्येकासाठी आदर आहे.रोग, बेरोजगारी, माफिया राज आणि भ्रष्टाचार वगळता, काँग्रेस, सपा आणि बसपा सरकारांनी राज्याला काय दिले?असा सवाल करून योगी आदित्यनाथ म्हणाले,

    पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, विभाजनाच्या राजकारणाला स्थान नाही. राज्यातील जनतेने प्रभू रामाच्या भक्तांवर गोळी झाडणारी तालिबान समर्थक, जातीयवादी आणि वंशवादी मानसिकता सहन करू नये. मोदीजींनी देशात तिहेरी तलाक रद्द केला. पण समाजवादी पक्षाचे नेते तालिबानच्या कृत्यांना पाठिंबा देत आहेत. पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या देशातील दहशतवाद्यांना आज कुठेही स्थान नाही.

    Congress mother of terrorism, Indiraji lashes out at saints, Sonia denies Rama’s existence, accuses Yogi Adityanath

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य