• Download App
    कर्नाटकात काँग्रेस आमदाराची इन्स्पेक्टरला धमकी, सत्तेत आल्यास सोडणार नसल्याचा इशारा|Congress MLA threatens inspector in Karnataka, warns that he will not leave if he comes to power

    कर्नाटकात काँग्रेस आमदाराची इन्स्पेक्टरला धमकी, सत्तेत आल्यास सोडणार नसल्याचा इशारा

    वृत्तसंस्था

    बंगळुरू : कर्नाटकात काँग्रेसचे आमदार आनंद न्यामागौडा यांनी पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करत धमकी दिली. आमचा पक्ष सत्तेत आल्यास आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असे ते म्हणाले. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये ते इन्स्पेक्टरसोबत वाद घालताना दिसत आहेत. ही घटना गुरुवारी बागलकोट जिल्ह्यात घडली.Congress MLA threatens inspector in Karnataka, warns that he will not leave if he comes to power

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमदार जमखंडी शहरात मौलाना अबुल कलाम आझम सर्कल बांधण्याचा विचार करत होते. त्यावर इन्स्पेक्टरने त्यांना समजावून सांगितले की, जर शहरात चौक बांधला तर समस्या होईल. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदाराने निरीक्षकाला शिवीगाळ केली.



    दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली. यावेळी आमदार म्हणाले की तुम्ही गप्प बसा. तुला काय माहिती आहे. कदाचित सध्याचे सरकार तुम्हाला साथ देत असेल. पण मी तुला सोडणार नाही.

    कर्नाटक काँग्रेस अध्यक्षांनी डीजीपींना नालायक म्हटले

    दोन दिवसांपूर्वीच कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी राज्याचे डीजीपी प्रवीण सूद यांना नालायक संबोधले होते. प्रवीण हे राज्यातील भाजप सरकारचा बचाव करत असून त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करत असल्याचा दावा त्यांनी केला होता. आपल्या पक्षाची सत्ता आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही शिवकुमार यांनी दिला होता.

    Congress MLA threatens inspector in Karnataka, warns that he will not leave if he comes to power

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची