बाथरूममध्ये घसरल्याने डोक्याला दुखापत झाली
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार पीएन पाटील यांचे कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. कोल्हापूरच्या करवीर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे ७१ वर्षीय काँग्रेस आमदार रविवारी त्यांच्या घरातील बाथरूममध्ये घसरून पडले होते. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. तेव्हापासून त्यांच्यावर कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार सुरू होते. ते लाइफ सपोर्टवर होते आणि बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाले.Congress MLA PN Patil passed away
पीएन पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष होते. 1995 मध्ये त्यांनी सांगरूळ, कोल्हापूर येथून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
पीएन पाटील घरात पाय घसरून पडल्यामुळे त्यांच्या मेंदूला आणि हाताला मोठी दुखापत झाली होती. यानंतर त्यांना कोल्हापुरातील ऍस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. मात्र, शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. पुढे चार दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
Congress MLA PN Patil passed away
महत्वाच्या बातम्या
- अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, 4 आयसिस दहशतवादी पकडले, सर्व श्रीलंकेचे रहिवासी
- पीएम मोदी म्हणाले, भाजप अल्पसंख्याक विरोधात नाही; पण विशेष नागरिक कुणालाही मानणार नाही
- रईसींच्या निधनानंतर इराणमध्ये सत्तासंघर्षाचा धोका; धर्मगुरू अन् लष्करात वर्चस्ववाद उफाळण्याची शक्यता
- सगळी मिथके तोडून भाजप दक्षिणेतला सगळ्यात मोठा पक्ष ठरेल; पंतप्रधान मोदींना विश्वास!!