विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हरियाणा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात बड्या – बड्या गोष्टी, पण संघटनेत बेरजेपेक्षा वजाबाकीच मोठी!!, अशी अवस्था झाली आहे.
काँग्रेसने आज हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी 40 पानांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये 25 लाखांपर्यंतचा मोफत इलाज, महिलांना दरमहा 2000 रुपये, शेतकरी आंदोलनातल्या सहभागींना शहिदांचा दर्जा, पेपर लीक मामल्यात फास्ट ट्रॅक कोर्ट, विद्यार्थिनींना मोफत पिंक बस – पिंक रिक्षा सेवा वगैरे बाबींचा समावेश आहे. “हाथ बदलेगा हालात” या नावाने काँग्रेसने हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात काँग्रेसच्या सुप्रसिद्ध 7 गॅरंटींचा देखील समावेश आहे.
पण एकीकडे जाहीरनाम्यात अशा बड्या – बड्या गोष्टी प्रसिद्ध करत असताना दुसरीकडे संघटनात्मक पातळीवर मात्र काँग्रेसमध्ये बेरजेपेक्षा वजाबाकीच मोठे झाल्याचे चित्र दिसले. कारण जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाचे प्रमुख स्पर्धक खासदार रणजीत सुरजेवाला आणि खासदार कुमारी शैलजा हे दोन नेते आणि त्यांचे समर्थक उपस्थितच नव्हते.
78 वर्षांच्या माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी बेरजेचे राजकारण करण्यापेक्षा वजाबाकीचा राजकारणातच धन्यता मानण्याचा परिणाम जाहीरनामा प्रकाशनाच्या कार्यक्रमात दिसून आला. या कार्यक्रमात राजस्थानमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पराभूत झाली, ते माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, हरियाणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष उदय भान आणि भूपेंद्र सिंह हुड्डा हे तीनच बडे नेते उपस्थित होते. हरियाणातील बाकीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
congress manifesto released for haryana elections haryana vidhan sabha election
महत्वाच्या बातम्या
- Rhea Barde : द फोकस एक्सप्लेनर : बन्ना शेख कशी झाली रिया बर्डे? भारतात अश्लील चित्रपट बनवले… अटकेतील बांगलादेशी पॉर्न स्टारची संपूर्ण कहाणी
- Jagan Mohan Reddy : प्रसादाच्या लाडूतील भेसळीचा वाद अंगावर आला; जगन मोहन रेड्डींनी राजकीय नौटंकी करत तिरुपतीचा दौरा रद्द केला!!
- Indonesia : सोन्याच्या खाणीत खोदकाम करणे जीवावर बेतलं, दरड कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू