• Download App
    गोव्यात काँग्रेस - शिवसेनेत महाविकास आघाडीची नुसतीच चर्चा, पण यात राष्ट्रवादी कुठेय?? Congress leaders including AICC Goa in-charge, Dinesh Gundu Rao met Shiv Sena leader Sanjay Raut today

    गोव्यात काँग्रेस – शिवसेनेत महाविकास आघाडीची नुसतीच चर्चा, पण यात राष्ट्रवादी कुठेय??

    गोव्यात काँग्रेसच्या तीन – चार नेत्यांनी एकत्र येऊन शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत यांच्याशी महाविकास आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा केली. काँग्रेसचे गोवा प्रदेश प्रभारी दिनेश गुंडूराव, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह तीन नेते या चर्चेत सहभागी झाले. शिवसेनेकडून फक्त संजय राऊत हेच सहभागी झाले होते. गोव्यात शिवसेनेचे “जेवढे” राजकीय अस्तित्व आहे “तेवढेच” प्रतिनिधित्व कालच्या चर्चेत होते…!!Congress leaders including AICC Goa in-charge, Dinesh Gundu Rao met Shiv Sena leader Sanjay Raut today

    शिवसेनेचे गोव्यातले राजकीय अस्तित्व फक्त उत्तर गोव्या पुरते मर्यादित आहे. शिवसेनेचा गोवा विधानसभेत एकही आमदार नाही. तरी देखील राजकीय बार्गेनिंग संजय राऊत यांनी शिवसेनेसाठी सात ७ – ८ जागांची मागणी केली. गेल्या ५ वर्षांत १७ आमदारांवरून २ आमदार ही काँग्रेसची राजकीय “कामगिरी” आहे…!! त्या काँग्रेसकडे शिवसेनेचे नेते आघाडी करण्यासाठी स्वतःचा गोवा विधानसभेत एकही आमदार नसताना ७ – ८ जागा मागतात यातच महाविकास आघाडीचे आगामी निवडणुकीतील “भव्यदिव्य” राजकीय यश दिसून येत आहेत…!!


    शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत पक्षाला ठोकणार रामराम


    शिवाय यात एक महत्त्वाचा मुद्दा शिल्लक राहतोच तो म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात महाविकास आघाडीची चर्चा झाली खरी… पण जो महाविकास आघाडी शब्द ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे महाराष्ट्रात अस्तित्वात आला, ती राष्ट्रवादी काँग्रेस गोव्यातल्या महाविकास आघाडी चर्चेत होती
    कुठे…?? राष्ट्रवादी काँग्रेसचे गोवा विधानसभेत निदान एक आमदार तरी होते. म्हणजे महाविकास आघाडी खऱ्या अर्थाने स्थापन करायची झाल्यास काँग्रेस खालोखाल शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला महत्त्व देणे अधिक अपेक्षित आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी गोव्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरखास्त करून तो तृणमूल काँग्रेस मध्ये विलीन करून टाकला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे एक आमदाराचे “राजकीय कर्तृत्व” सध्या तृणमूल काँग्रेस मध्ये “विलीन” आहे. मग राष्ट्रवादीच्या वतीने महाविकास आघाडीच्या वाटाघाटी नेमक्या कोण करणार?, हाच मूलभूत प्रश्न तयार झाल्याने महाविकास आघाडी चर्चेत काल तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणीच प्रतिनिधी हजर नव्हते.

    त्यामुळे गोव्यातली महाविकास आघाडीची विद्यमान राजकीय स्थिती अशी : काँग्रेस १७ वरून २ आमदार + शिवसेना 0 आमदार + राष्ट्रवादी काँग्रेसचे वाटाघाटीसाठी नेतेही अस्तित्वात नाहीत = चमकदार राजकीय यश!!

    गोव्याचा दुसरा ओपिनियन पोल जाहीर झाला आहे. यात भाजप सत्ताधारी पक्ष, आम आदमी पार्टी प्रमुख विरोधी पक्ष, काँग्रेस गाळात आणि तृणमूल काँग्रेस डब्यात अशी स्थिती दिसते आहे. आता एवढे सगळे असेल तर महाविकास आघाडी आहे कुठे?? तिची नुसतीच दोन पक्षांमध्ये चर्चा आहे, तिसरा पक्ष सैरभैर आहे…!!

    Congress leaders including AICC Goa in-charge, Dinesh Gundu Rao met Shiv Sena leader Sanjay Raut today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला