Sonia Gandhi Letter to PM Modi : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून विनंती केली की, कोरोना महामारीमुळे आई-वडिलांचे किंवा त्यांच्यातील एकाचे छत्र हरवलेल्या बालकांना नवोदय विद्यालयांतून मोफत शिक्षण देण्याबाबत विचार व्हावा. त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून असेही म्हटले की, मुलांना उज्ज्वल भविष्याचे स्वप्न देणे राष्ट्र म्हणून सर्वांची जबाबदारी आहे. Congress Leader Sonia Gandhi Letter to PM Modi, requesting free education in Navodaya Vidyalaya to Orphen childrens due to Covid 19
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून विनंती केली की, कोरोना महामारीमुळे आई-वडिलांचे किंवा त्यांच्यातील एकाचे छत्र हरवलेल्या बालकांना नवोदय विद्यालयांतून मोफत शिक्षण देण्याबाबत विचार व्हावा. त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून असेही म्हटले की, मुलांना उज्ज्वल भविष्याचे स्वप्न देणे राष्ट्र म्हणून सर्वांची जबाबदारी आहे.
सोनिया गांधी म्हणाल्या, “कोरोना महामारीच्या भयावह स्थितीत अनेक बालकांचे आईवडिलांचे किंवा त्यातील एकाचे छत्र हरवल्याच्या बातम्या येतात, ज्या वेदनादायी आहेत. या मुलांना धक्का बसलेला आहे आणि त्यांच्या निरंतर शिक्षण आणि भविष्यासाठी कोणतीही मदत उपलब्ध नाही.”
माजी पंतप्रधान आणि त्यांचे पती राजीव गांधी यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या नवोदय विद्यालयांचा संदर्भ कॉंग्रेस अध्यक्षांनी दिला आणि त्या म्हणाल्या की, सध्या देशात 661 नवोदय विद्यालये सुरू आहेत. कोरोना आईवडील किंवा एकाला गमावणाऱ्या मुलांना या नवोदय विद्यालयात विनामूल्य शिक्षण देण्याबाबत त्यांनी पंतप्रधानांना आग्रह केला. त्या म्हणाल्या की, “मला असं वाटतं की या मुलांनी अकल्पनीय दु:ख भोगल्यानंतर त्यांना चांगल्या भविष्याची आशा देण्याची एक राष्ट्र म्हणून आपली जबाबदारी आहे.”
भारतातील कोरोनाची स्थिती
देशात कोरोना रुग्णसंख्येत पूर्वीपेक्षा घट होत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये 2,76,110 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 3874 संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी कोरोनातून 3,69,077 जण बरे झाले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या 96,841 ने कमी झाली आहे. अशी घट सुरू राहिली तर लवकरच ही दुसरी लाट ओसरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Congress Leader Sonia Gandhi Letter to PM Modi, requesting free education in Navodaya Vidyalaya to Orphen childrens due to Covid 19
महत्त्वाच्या बातम्या
- Black Fungus : काळ्या बुरशीवरील औषधाचा तुटवडा लवकरच दूर होणार, आणखी ५ फार्मा कंपन्यांना उत्पादनाचा परवाना
- या बनावट प्रशांत किशोरपासून सावधान! तिकीट देण्याच्या आमिषाने दिग्गज राजकारण्यांना घातला कोट्यवधींचा गंडा
- WATCH : विध्वंसकारी तौकते चक्रीवादळानंतर गिर अभयारण्यात सिंहांचा पुन्हा मुक्त संचार
- Corona Deaths : कोरोनामुळे एका दिवसात सर्वाधिक मृत्यूचा रेकॉर्ड भारताच्या नव्हे, तर अमेरिकेच्याच नावावर, वाचा सविस्तर..
- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, गडकरी महाराष्ट्राचे नेते, ते पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंदच!