विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांच्यासाठी आजचा वाढदिवस खास ठरला. तो गांधी परिवाराचे सरकारी निवासस्थान 10 जनपथ येथे तर साजरा झालाच, पण त्या पलीकडे जाऊन लोकसभा निवडणुकीत 99 जागा जिंकून काँग्रेसचा परफॉर्मन्स उंचावल्यानंतर राहुल गांधींचा 54 वा वाढदिवस काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात साजरा केला. Congress leader Rahul Gandhi celebrates his 54th birthday at AICC Headquarters in Delhi.
काँग्रेसचे मुख्यालय 24 अकबर रोड येथे आज जबरदस्त सेलिब्रेशनचे वातावरण होते. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले असले, तरी भाजपने स्वबळावरचे बहुमत गमावले. काँग्रेसने 54 जागांवरून तब्बल 99 जागांवर उडी घेतली. राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड या दोन लोकसभा मतदारसंघांमधून जिंकले. पण राहुल गांधींनी रायबरेलीची जागा आपल्याकडे ठेवली आणि वायनाड मध्ये प्रियांका गांधी यांची उमेदवारी जाहीर केली. अशा एकापाठोपाठ एक आनंदाच्या बातम्या काँग्रेसमध्ये येऊन धडकल्याने पक्षातले वातावरण चैतन्यमय झाले होते. त्याचेच प्रतिबिंब आज राहुल गांधी यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन मध्ये पडले.
वाढदिवसाच्या सेलिब्रेशन साठी राहुल गांधी 24 अकबर रोड या मुख्यालयात पोहोचले. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल, प्रियांका गांधी, अजय माकन, गौरव गोगोई, मुकुल वासनिक अशी नेत्यांची मांदियाळी तिथे हजर होती. राहुल गांधींनी पत्रकार परिषदेच्या हॉलमध्ये येऊन आपल्या वाढदिवसाचा केक कापला. या केकचा पहिला घास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राहुल गांधींना भरविला. राहुल गांधींनी केकचा घास मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रियांका गांधी यांना भराविला. मुकुल वासनिक यांनी राहुल गांधींना भेटवस्तू दिली. यावेळी सगळ्या काँग्रेस नेत्यांनी आनंदाने टाळ्यांचा जोरदार गजर केला.
Congress leader Rahul Gandhi celebrates his 54th birthday at AICC Headquarters in Delhi.
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या अनपेक्षित अपयशाच्या दुष्परिणाम; संसदेभोवती घट्ट आवळला घराणेशाहीचा फास!!
- भारतीय नौदलाच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सहा पाणबुड्यांचा समावेश
- राहुल गांधी रायबरेली ठेवणार, वायनाड सोडणार; प्रियांका गांधी तिथून लढणार!!
- अर्थसंकल्प 2024: अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्पापूर्वी उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार