• Download App
    काँग्रेस भ्रष्टाचाराची महाराणी, भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचा हल्लाबोल ; काँग्रेस, दलाली एकाच नाण्याच्या दोन बाजू । Congress is the queen of corruption, BJP president Nadda's attack; Congress, brokerage, two sides of the same coin

    काँग्रेस भ्रष्टाचाराची महाराणी, भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचा हल्लाबोल ; काँग्रेस, दलाली एकाच नाण्याच्या दोन बाजू

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काँग्रेस आणि दलाली या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जणू एक महाराणी आहे, अशी जोरदार टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. Congress is the queen of corruption, BJP president Nadda’s attack; Congress, brokerage, two sides of the same coin

    नड्डा म्हणाले, देशात आजपर्यंत झालेल्या संरक्षण साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे. काँग्रेस आणि दलाली या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे या माध्यमातून स्पष्ट होते. जे.पी. नड्डा हे उत्तराखंड दौऱ्यावर आले आहेत.चमोली येथे सोमवारी त्यांनी शहीद सन्मान यात्रेत भाग घेतला. ते म्हणाले, २०१४ पूर्वी वीस वर्षे सरंक्षणाकडे काँग्रेसने अक्षम्य दुर्लक्ष केले.



    संरक्षण साहित्य खरेदी केली नाही. आमचे जवान शस्त्राशिवाय कसे लढू शकतील, याचा विचार काँग्रेसने केला नाही. अहिंसेच्या स्वप्नाळू जगात जगणाऱ्या काँग्रेसने जवानांच्या जीवाची काळजी घेतली नाही. अशा खडतर परिस्थितीत जवान लढा देत राहिले आणि काँग्रेस त्याकडे सतत दुर्लक्ष करत राहिली.

    Congress is the queen of corruption, BJP president Nadda’s attack; Congress, brokerage, two sides of the same coin

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार