विशेष प्रतिनिधी
बेंगलोर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांना मिळालेल्या जागांमध्ये जरी दुप्पट फरक असला तरी प्रत्यक्षात मतदानाची टक्केवारी नीट पाहिली तर भाजपने तिथे मतांची टक्केवारी गमावलेली नाही, तर तीच म्हणजे %36.17%* ठेवण्यात भाजप यशस्वी झाला आहे. पण काँग्रेसने मात्र धर्मनिरपेक्ष जनता दल अर्थात माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडांच्या जेडीएसची मते खेचून आणत आपल्या मतांची टक्केवारी वाढवली आहे आणि ती 42. 93 % पर्यंत नेऊन ठेवली आहे. हेच खरे काँग्रेसच्या प्रचंड विजयाचे राजकीय इंगित आहे.Congress increased its vote share by cutting JDS vote
2018 च्या निवडणुकीत जेडीएसला 17 % पेक्षा जास्त मते होती. पण 2023 च्या निवडणुकीत घटून 12.97 % झाली आहेत. याचा अर्थ जेडीएसला तब्बल 4.5 % मतांचा फटका बसला आहे. पण काँग्रेसने मात्र आपल्या मतांची टक्केवारी सुमारे 7 % नी वाढवली आहे. पण त्यामुळे काँग्रेसच्या विजयी जागांमध्ये त्यामुळे दुप्पट फरक झाला आहे.
काँग्रेस सध्या 137 जागांवर आघाडीवर आहे तर भाजप 63 आणि जेडीएस 20 जागांवर आघाडीवर आहे.
याचा अर्थ भाजपला पूर्णपणे पराभव पत्करावा लागला असून काँग्रेस बहुमतापेक्षा कितीतरी अधिक जागा मिळवून सत्तेवर येणार आहे. त्यांना आमदारांच्या संख्याबळाच्या आधारावर जेडीएसच्या टेकूची गरज उरलेली नाही. पण मतदानाच्या टक्केवारीच्या हिशेबात मात्र जेडीएसची मते घटणे काँग्रेसच्या पथ्यावर पडले आहे.
जागांच्या हिशेबात म्हैसूर कर्नाटकात जेडीएसच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने 20 जागांवर विजय मिळवला आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नातवाचा पराभव झाला आहे.
याचा अर्थ भाजपने स्वतःची मतदानाची टक्केवारी वाढवण्याची लढाई हरली आहे, पण ती एक प्रकारे बरोबर बरोबरीत देखील सोडवली आहे. कारण भाजपचा 2018 च्या निवडणुकीत 36 % एवढाच व्होट शेअर होता. तो तसाच्या तसा इन्टॅक्ट राहिला आहे. भाजपला आपली मतांची टक्केवारी वाढवता आलेली नाही तपण त्याचा परिणाम मात्र जागा घटण्यात मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागला आहे. त्या उलट 7 % टक्के मते जास्त मिळवून काँग्रेसने भाजप पेक्षा दुप्पट जागा मिळवल्या आहेत. दक्षिणेतली दरवाजे उघडण्याचा भाजपच्या मोहिमेला यातून खिळ निर्माण झाली आहे.
Congress increased its vote share by cutting JDS vote
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री कोण?? : ना सिद्धरामय्या, ना शिवकुमार; मल्लिकार्जुन खर्गे कर्नाटक विजयाचे शिल्पकार!!; दिल्लीत काँग्रेस मुख्यालयासमोर मोठे पोस्टर!!
- Karnataka Election Result : भाजपाशी बंडखोरी जगदीश शेट्टर यांना भोवली; मोठ्या फरकाने झाले पराभूत!
- IASच्या बदलीवर दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल पुन्हा आमनेसामने, प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
- सिद्धरामय्या विरुद्ध शिवकुमार : काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग; डी. के. शिवकुमारांची सर्व आमदारांसाठी खास हवाई व्यवस्था!!