• Download App
    गोव्यातील कॉँग्रेस धास्तावली, ३७ उमेदवारांना नेऊन ठेवले हॉटेलमध्ये|Congress in Goa panicked, took 37 candidates to hotel

    गोव्यातील कॉँग्रेस धास्तावली, ३७ उमेदवारांना नेऊन ठेवले हॉटेलमध्ये

    विशेष प्रतिनिधी

    पणजी : गोव्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत १७ जागा मिळवूनही काँग्रेसला सरकार स्थापन करता आले नाही. त्यामुळे यावेळी कुठलाही दगाफटका रोखण्यासाठी काँग्रेसने त्यांनी निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच आपल्या सर्व ३७ उमेदवारांना दोन हॉटेलमध्ये हलवले आहे. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी याचा इन्कार केला आहे. आमच्या एका नेत्याचा वाढदिवस आहे.Congress in Goa panicked, took 37 candidates to hotel

    जो तो हॉटेलमध्ये साजरा करत आहे. तिथे सर्व उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहे. मीही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. आमदारांना हॉटेलमध्ये कोंडण्यासारखे काही नाही, असे चिदम्बरम म्हणाले.२०१७ मध्ये झालेल्या फोडाफोडीवर चिदंबरम म्हणाले, मागच्या वेळी सारखी स्थिती येऊ देणार नाही.



    यावेळी आम्हाला शंभर टक्के आत्मविश्वास आहे. आमचा एकही आमदार कोणीही फोडू शकत नाही. ज्या उमेदवारांना आम्ही तिकीट दिले ते सर्व विजयी होतील. आमचे विजयी आमदार गुरुवारी त्यांच्या नेत्याचे नाव ठरवतील.निवडणुकांचे एक्झिट सोमवारी आले. या एक्झिट पोलमध्ये गोव्यात विधानसभेत त्रिशंकू स्थिती म्हणजे कुणालाही बहुमत मिळण्याची शक्यता नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

    यानंतर गोव्यात राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांची मोचेर्बांधणी सुरू केली आहे. उत्तर गोव्यातील उमेदवारांना तेथील एका हॉटेलमध्ये नेण्यात आले आहे. दुसरीकडे दक्षिण गोव्यातील उमेदवारांना तेथील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे,

    अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे.पी. चिदंबरम, गोवा काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर पणजीत आमदारांसोबत ठाण मांडून आहेत. यावेळी काँग्रेसला कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा होऊ द्यायचा नाहीए.

    या नेत्यांनी ५ मार्चला राहुल गांधी यांचीही भेट घेऊन त्यांना पुढील रणनीती सांगितली होती. त्याचवेळी, सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भाजपच्या हायकमांडने अचानक दिल्लीला बोलावले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली.

    Congress in Goa panicked, took 37 candidates to hotel

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही