विशेष प्रतिनिधी
कोलकता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत काँग्रेस एकटी लढत असल्याने सध्या चौथ्या स्थानावर आहे पण काँग्रेसने लाडक्या बहिणींवर आणि शेतकऱ्यांवर पैशांच्या घोषणांचा तुफान पाऊस पडलाय. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला या जाहीरनाम्यात त्यांनी बंगाली जनतेला तुफानी आश्वासने दिली.Congress in fourth place in West Bengal race, but rains of money slogans on beloved sisters and farmers!!
प्रत्यक्षात पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत आहे. काँग्रेसने 284 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला फक्त 25 जागा देऊ केल्या होत्या त्यामुळे काँग्रेसने चिडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवायचा निर्णय घेतला.
– काँग्रेस स्वतंत्रपणे लढते
2021 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने कम्युनिस्ट पक्षाबरोबर आघाडी केली होती, पण 2026 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने कम्युनिस्टांनाही बाजूला सारले आणि स्वबळावर निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. या राजकीय परिस्थितीमुळे काँग्रेस पश्चिम बंगाल मधल्या लढतीत सध्या चौथ्या स्थानावर आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातच राज्यातली खरी लढत असणार आहे. एकेकाळी पश्चिम बंगालवर राज्य केलेल्या कम्युनिस्टांना तिसऱ्या स्थानावरून लढावे लागते आहे, तर काँग्रेस चौथ्या स्थानावर आहे.
– लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांवर पैशांचा वर्षाव
पण काँग्रेसने पश्चिम बंगाल मधल्या लाडक्या बहिणींवर आणि शेतकऱ्यांवर भरपूर पैशांच्या घोषणांचा पाऊस पाडलाय. लाडक्या बहिणींना दरमहा दोन हजार रुपये, शेतकऱ्यांना वर्षाला 15000 रुपये देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले. त्याचबरोबर महिलांना दहा लाखांचा आरोग्य विमा आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी मोठे पॅकेज यांचाही जाहीरनाम्यात समावेश केला आहे. पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेस सत्तेवर येण्याची सुतराम शक्यता नाही, तरीसुद्धा पक्षाने आश्वासनांचा पाऊस पडण्यात हात आखडता घेतलेला नाही.
Congress in fourth place in West Bengal race, but rains of money slogans on beloved sisters and farmers!!
महत्वाच्या बातम्या
- “कवडीची किंमत देत नाही” ते “परिपक्वता किती ते माहिती नाही”; शरद पवारांचा पार्थ वर राग कायम!!
- मी तर जामिनावर बाहेर; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल की भाजपच्या आरोपांवरून स्वतःच दिली कबुली??
- Anjali Damania : या, चहा प्या आणि CDR कसा काढला ते पाहा; अंजली दमानियांचे राऊत, अंधारेंना आमंत्रण
- Minister Lodha : जैन समाज हिंदूच, अल्पसंख्याक दर्जा फेकून देण्याची वेळ; मंत्री मंगलप्रभात लोढांचे रोखठोक भाष्य