• Download App
    डी. के. शिवकुमार नव्हे, सिद्धरामय्या "सचिन पायलट" बनवण्याचा धोका??; काँग्रेस हायकमांडला दाट शंका|Congress high command in a fix, siddaramaiah may become trouble factor for Congress

    डी. के. शिवकुमार नव्हे, सिद्धरामय्या “सचिन पायलट” बनवण्याचा धोका??; काँग्रेस हायकमांडला दाट शंका

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेसने भाजपचा पराभव करून चार दिवस उलटून गेले तरी पक्षाला मुख्यमंत्री पदाचा निर्णय अद्याप करता आलेला नाही. कारण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यातली स्पर्धा थांबण्याऐवजी तीव्र झाली आहे. काँग्रेस हायकमांडने वेगवेगळ्या फॉर्म्युलांवर चर्चा जरूर केली आहे. पण त्यापैकी एकही फॉर्म्युला वर्क झालेला नाही. यामध्ये 3 – 2, 2 – 3 असे मुख्यमंत्रीपद फिरवण्याचा फॉर्मुला पुढे आला. डी. के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री पद त्यांच्या पसंतीचे खाते हा फॉर्मुला पुढे आला. पण यापैकी कुठल्याच फॉर्म्युल्यावर मतैक्य होऊ शकलेले नाही.Congress high command in a fix, siddaramaiah may become trouble factor for Congress



    त्याचबरोबर राहुल गांधींची पसंती सिद्धरामय्या, तर सोनिया गांधींची पसंती शिवकुमार अशा बातम्या समोर आल्याने पक्षात संभ्रमावस्था आणखी वाढली. त्यातच कर्नाटक मध्ये “सचिन पायलट” कोणी होऊ नये याची काळजी पक्षश्रेष्ठी घेत असले तरी त्यांना डी. के. शिवकुमार यांच्या विषयी नव्हे, तर सिद्धरामय्या यांच्या विषयी जास्त शंका आहे. त्याची कारणे देखील स्पष्ट आहेत. डी. के. शिवकुमार यांनी संघटनात्मक पातळीवर कर्नाटकात काम केले आहे आणि गांधी परिवाराशी त्यांची अभंग निष्ठा आहे. मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत उतरताना त्यांनी गांधी परिवाराशी पंगा घेण्याची अजिबात शक्यता वर्तवलेली नाही.

     सिद्धरामय्यांची काँग्रेसनिष्ठा संशयास्पद

    त्या उलट मुमूळातच सिद्धरामय्या हे काँग्रेस मधले नेते नाहीत. ते देवेगौडांपासून अलग होऊन काँग्रेसमध्ये आले आहेत. सोशल इंजिनिअरिंगच्या त्यांच्या प्रयोगातून त्यांनी काँग्रेसला सत्तेवर आणून दाखवले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाशी निष्ठा आणि गांधी परिवाराशी निष्ठा यांचा सिद्धरामय्या यांच्याशी दाट संबंध नाही. त्यामुळे सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री पद दिले नाही, तर ते सध्या गप्प बसू शकतील पण भविष्यात ते तसेच “गप्प” राहतील का??, याविषयी काँग्रेस हाय कमांडच्या मनात दाट शंका आहे. त्यामुळे शिवकुमार नव्हे, तर सिद्धरामय्या हे सचिन पायलट बनण्याच्या धोका हायकमांडला वाटतो. त्यामुळेच कर्नाटकात मुख्यमंत्री पदाच्या निर्णयासाठी विलंब होत असल्याचे दिसून येते.

    Congress high command in a fix, siddaramaiah may become trouble factor for Congress

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Economic Survey 2026 : 40% गिग कामगारांची कमाई ₹15 हजारपेक्षा कमी; आर्थिक सर्वेक्षणामध्ये किमान कमाई निश्चित करण्याची शिफारस; प्रतीक्षा कालावधीचे पैसे देण्याचा सल्ला

    India-EU FTA : केंद्राने EUच्या सफरचंदांवर आयात शुल्क कमी केले; 50 ऐवजी 20% केले, हिमाचल सफरचंद उद्योगावर संकट

    Supreme Court : SIR वर सुनावणी- सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला; याचिकाकर्ते म्हणाले- ECI मनमानी करू शकत नाही