EVM आणि मतदार याद्या या खोट्या मुद्द्यांवरून राहुल गांधींनी धोपटली भुई, जनता काँग्रेसच्या हातात 0 भोपळा देई!!, अशी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसची अवस्था झाली.
दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या आर आदमी पार्टीची सत्ता गेली आणि भाजपची सत्ता आली, पण काँग्रेसच्या हाती शून्य भोपळा आला. निवडणुकीच्या ऐन मध्यावर राहुल गांधी प्रियांका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रचारात भाग घेणे सोडूनच दिले होते. काँग्रेसने ही स्ट्रॅटेजी आखली आहे. आर्मी पार्टीला “पुढे चाल” देण्याचा त्यांचा इरादा आहे, अशा बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या. पण त्यामुळे काँग्रेसने दिल्लीची निवडणूक “सोडून” दिली असे “पर्सेप्शन” तयार झाले. त्याचा फटका आपल्याला बसेल, याची जाणीव झाल्यानंतर राहुल, प्रियांका आणि खर्गे हे तिन्ही नेते पुन्हा प्रचारात आले. पण प्रचाराच्या पर्यटनाखेरीज दुसरे काही घडले नाही. त्यामुळे काँग्रेसला दिल्लीत कधी नव्हे, एवढा दारूण पराभव सहन करावा लागला.
प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधींनी यमुना किनाऱ्यावरच्या काही भागांना भेटी दिल्या त्याचे शूट करून घेतले आणि ते काँग्रेस आणि आपल्या सोशल मीडिया हँडलवर टाकले ही पहा तुमची दिल्ली आणि तुमची यमुना कशी गंदी केली आहे असे सांगत राहुल गांधींनी केजरीवालांच्या अपयशाकडे दिल्लीकरांचे लक्ष वेधले. त्यानंतर त्यांनी बोटीत बसून प्रदूषणग्रस्त यमुनेची सफर केली परंतु प्रचार पर्यटनाखेरीस दुसरे यातून काही साध्य झाले नाही. या सगळ्याचा कळस म्हणजे त्यांनी विधानसभा निवडणूक निकालाच्या दिवशी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन मतदार याद्यांवर ऑब्जेक्शन घेतले. पण यातून राहुल गांधी स्वतःच “एक्स्पोज” झाले. कारण त्यांचे पॉलिटिकल टायमिंग चुकले. दिल्लीचा निकाल लागत असताना महाराष्ट्रातल्या मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेण्याचे काहीच कारण नव्हते पण त्यांनी तसे केले आणि त्यामुळे काँग्रेसचा पराभव दिसल्यानेच राहुल गांधींनी मतदार याद्यांचे “एक्सक्युज” शोधले असा आरोप करायची संधी भाजपच्या नेत्यांना मिळाली.
या सगळ्यांमध्ये दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस स्वतंत्र लढले हा विषय महत्त्वाचा ठरलाच पण त्या पलीकडे जाऊन काँग्रेसने हरियाणातली चूक दिल्लीत केली नाही, ही बाब देखील महत्त्वाची ठरली होती. हरियाणामध्ये आपण जिंकूच या अहंकारापोटी काँग्रेसमध्ये गटबाजी वाढली होती. तिथे भूपेंद्र सिंग हुड्डा यांनी बाकीच्या सगळ्या नेत्यांना बाजूला करून आपल्याच गटाची तिकीट भरती केली होती. त्याचा फटका हरियाणात बसला. त्यापासून धडा घेऊन काँग्रेसने दिल्लीत फारशी गटबाजी होऊ दिले नव्हती. उलट काँग्रेसने शीला दीक्षित यांच्या राजवटीची दिल्लीकरांना आठवण करून दिली होती. पण या सगळ्याचा काही उपयोग झाला नाही कारण काँग्रेसने आणि त्यांच्या नेत्यांनी संघटनात्मक पातळीवर आणि बूथ लेवलवर फारसे कामच उभे केले नव्हते. त्या उलट भाजप आणि आम आदमी पार्टी यामध्ये फारच आघाडीवर गेल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून त्या दोन पक्षांमध्येच चुरशीची लढत झाली आणि काँग्रेसच्या हाती 0 भोपळा आला.
Congress harped on false issues lead to their 0 performance
महत्वाच्या बातम्या
- US H-1B visa : अमेरिकेच्या H-1B व्हिसासाठी अर्ज करण्याची तारीख जाहीर
- Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल अन् संजय सिंह यांची चौकशी करण्यासाठी ACBचे पथक रवाना
- S. Jaishankar: अमेरिकेने १५ वर्षांत किती भारतीयांना मायदेशी पाठवले?
- फडणवीसांनी राहुल गांधींवर केला कव्हर फायरिंगचा आरोप; पण मग केजरीवालांनी काय केलं??