• Download App
    कॉँग्रेस सरकारांनी उत्तराखंडला विकासापासून ठेवले दूर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका|Congress governments keep Uttarakhand away from development, criticizes Prime Minister Narendra Modi

    कॉँग्रेस सरकारांनी उत्तराखंडला विकासापासून ठेवले दूर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    डेहराडून : केंद्रातील आणि उत्तराखंडमधील याआधीच्या काँग्रेस सरकारांनी या राज्याला विकासापासून दूर ठेवले. विकास प्रकल्प राबवण्यास विलंब केला. त्यामुळे या राज्यातील ग्रामीण भागांतील नागरिकांवर अन्य राज्यांत आणि शहरांमध्ये स्थलांतर करण्याची वेळ आली, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली.Congress governments keep Uttarakhand away from development, criticizes Prime Minister Narendra Modi

    उत्तराखंड विधानसभा निवडणुकीनिमित्त हल्दवानी येथे प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधानांनी यावेळी १७,५०० कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यातील लखवार हायड्रो पॉवर प्रकल्पासाठी ५,७४७ रुपयांचा निधी देण्यात आला आहे.



    त्यावेळी काँग्रेसवर जोरदार टीका करताना पंतप्रधान म्हणाले, काँग्रेसने कोणताही विकास न करता केवळ या राज्याला लुटण्याचे काम केले. उत्तराखंडच्या ग्रामीण भागांत रस्ते आणि अन्य प्रकल्पांचा अभाव आहे. रोजगार नसल्याने ग्रामीण भागांतील तरुणांना आपले घर सोडावे लागले.

    लखवार प्रकल्प हा १९७४मधील असूनही काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे तो पूर्ण झाला नाही. ४६ वर्षांनी हा प्रकल्प पूर्ण होत आहे, असे सांगून मोदी म्हणाले हा प्रकल्प जर लवकर पूर्ण झाला असता तर उत्तराखंडच्या डोंगराळ भागांतील नागरिकांची वीज,पिण्यासाठी आणि शेतीसाठीच्या पाण्याची समस्या लवकरच सुटली असती.

    पंतप्रधान म्हणाले, मागील सात वर्षांतील माझ्याा सरकारचे कामकाज तपासून पाहा. मी जुन्या गोष्टी शोधून त्या दुरुस्त करण्याच्या मागे लागलो आहे. यातच माझा वेळ जात आहे. तुम्ही विरोधकांना दुरुस्त करा.

    Congress governments keep Uttarakhand away from development, criticizes Prime Minister Narendra Modi

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य