विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – काँग्रेसचे वरिष्ठ नेते मनीष तिवारी यांच्या नव्या पुस्तकामुळे पक्षाचीच कोंडी झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात तत्कालीन यूपीए सरकारने कोणतीही कारवाई न करणे हा सरकारचा कमकुवतपणा ठरल्याचा दावा त्यांनी केला आहे.Congress goan backtrack due to New book
भाजपने याच मुद्यावरून काँग्रेस पक्षाला धारेवर धरले आहे. पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी म्हटले आहे की,‘‘ तत्कालीन यूपीए सरकारचा हेतू वाईट होता. तेव्हाच्या हवाईदल प्रमुखांनी आम्ही हल्ल्यासाठी तयार होतो असे सांगितले होते पण त्यांना कारवाईची परवानगी देण्यात आली नव्हती. काँग्रेसला याबाबत उत्तर द्यावे लागेल.’’
‘१० फ्लॅशपॉइंट ः २० इअर्स- नॅशनल सिक्युरिटी सिच्युएशन दॅट इम्पॅक्ट इंडिया’ नामक पुस्तकामध्ये तिवारी यांनी अनेक मुद्यांना स्पर्श केला आहे. हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही. तिवारी यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये म्हटले आहे की, ‘‘ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करायला हवी होती. ती वेळच अशी होती की तेव्हा प्रत्यक्ष कृती करणे गरजेचे होते.
Congress goan backtrack due to New book
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशात विरोधकांच्या हालचाली वाढल्या, अखिलेश यांनी घेतली विविध नेत्यांची भेट
- काश्मीर खोरे थंडीने गारठले, राजस्थानातही थंडी वाढली
- मोदी विरुद्ध दीदी… काँग्रेस मुक्त भारताच्या दिशेने निघालेली सुसाट गाडी…!!
- ममता एकीकडे विचारतात अखिलेशना मदत हवी आहे का? दुसरीकडे अखिलेश यांची आप नेत्यांशी हातमिळवणी!!