वृत्तसंस्था
जयपूर : द काश्मीर फाईल्स हा चित्रपटात राजस्थानातं प्रदर्शित होत असल्याचा धसका राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारने घेतला असून कोटा जिल्ह्यात जमावबंदी लागू करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबला आहे. Congress fears Kashmir files; Religious freedom also attacked in Kota district of Rajasthan due to curfew
जम्मू आणि काश्मीरमधून काश्मिरी पंडितांना हुसकावून लावल्याचा आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा या चित्रपटातून फोडली आहे. पण, सत्य दाबण्याची कॉग्रेसची वृत्ती जमावबंदी आदेश लागू करताना पुन्हा दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट लोकांनी बघू नये, यासाठी हा खटाटोप केल्याचे आदेशातून स्पष्ट दिसत आहे.
विविध सणांच्या पार्श्वभूमींचा उल्लेख आदेशात करताना शेवटी चित्रपट प्रदर्शित होत असल्याने कायदा आणि सुव्यस्थेसाठी आदेश लागू करत असल्याचे म्हंटले आहे. त्या शिवाय महावीर जयंती, गुड फ्रायडे, वैशाखी, जुगातुलविदा या सारख्या धार्मिक कार्यक्रमामध्ये मिरवणूक काढण्याची प्रथा चालत आली आहे. त्यावर आदेशानव्ये बंदी घालून धार्मिक स्वातंत्र्याचा गळा गोठण्याचा डाव रचला आहे. तसेच पाण्यात पुडून अनेकांचे मृत्यू होतात. त्यामुळे जलस्नान करू नका, असे सांगण्याचा प्रयत्न देखील केला गेला आहे. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे प्रयत्न सरकारने केल्याचा आरोप होत आहे.
Congress fears Kashmir files; Religious freedom also attacked in Kota district of Rajasthan due to curfew
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : १२६ वर्षीय स्वामी शिवानंदांच्या सन्मानार्थ पंतप्रधान मोदीही झाले नतमस्तक, योगासाठी मिळाला पद्मश्री पुरस्कार, व्हिडिओ व्हायरल
- उत्तराखंडमध्ये धामी, गोव्यात सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब, जाणून घ्या कधी घेणार दोन्ही मुख्यमंत्रिपदाची शपथ
- चिंताजनक : बायडेन यांच्या वक्तव्याने रशियाचा संताप, अमेरिकेच्या राजदूताला बजावले समन्स, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला
- काश्मिरात पुन्हा सर्वसामान्य लक्ष्य ; गैर-काश्मिरी नागरिक दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, २४ तासांत ३ जणांवर हल्ला, एक जण ठार