• Download App
    Congress मुसलमान नेते काँग्रेसचे अध्यक्ष झालेत, पण पंतप्रधान मोदींनी नेहरू + गांधी परिवाराच्या नसेवर नेमके बोट ठेवलेय!!

    Congress मुसलमान नेते काँग्रेसचे अध्यक्ष झालेत, पण पंतप्रधान मोदींनी नेहरू + गांधी परिवाराच्या नसेवर नेमके बोट ठेवलेय!!

    नाशिक : मुसलमान नेते काँग्रेसचे अध्यक्ष जरूर झालेत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नेहरू + गांधी परिवाराच्या नसेवर नेमके बोट ठेवलेय, हे गांधी परिवारासकट काँग्रेसच्या नेत्यांनाही मान्य करावे लागेल.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज हरियाणातल्या हिस्सार मध्ये विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळ्यात भाषण करताना काँग्रेसला तुष्टीकरणाच्या राजकारणावरून ठोकून काढले. पण त्यापलीकडे जाऊन त्यांनी काँग्रेसला एक आव्हान दिले. काँग्रेसमध्ये जर हिंमत असेल, तर त्या पक्षाने मुस्लिम नेत्याला आपला पक्षाध्यक्ष नेमून दाखवावे आणि निवडणुकीचे 50 % तिकिटे मुस्लिमांना देऊन दाखवावीत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

    मोदींनी अत्यंत चलाखीने काँग्रेसच्या मुस्लिम अध्यक्ष पदाचा मुद्दा बाहेर काढला. त्यातून त्यांनी नेहरू + गांधी परिवाराच्या राजकीय नसेवर नेमके बोट ठेवले. वास्तविक 1885 पासून 2025 पर्यंत काँग्रेसच्या 140 वर्षांच्या इतिहासात मुसलमान नेते काँग्रेसचे अध्यक्ष जरूर झाले, पण ते सगळे भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी झाले होते. राजकीय दृष्टीने बोलायचे झाले, तर नेहरू आणि गांधी परिवाराचा काँग्रेसवर वरचष्मा तयार होण्यापूर्वी काँग्रेस संघटनेने मुस्लिम नेत्यांना अध्यक्षपदी निवडले होते. परंतु पंडित जवाहरलाल नेहरू 1947 मध्ये पंतप्रधान झाले. काँग्रेसच्या संपूर्ण संघटनेवर देखील त्यांचे वर्चस्व निर्माण झाले. त्यानंतर आजतागायत काँग्रेसने मुस्लिम नेत्याला पक्षाध्यक्षपदी निवडलेले नाही.

    काँग्रेसचे मुस्लिम अध्यक्ष :

    रहमतुल्ला एम सयानी 1896, (कलकत्ता), सय्यद हसन इमाम 1918 (मुंबई), हकीम अजमल खान 1921 (अहमदाबाद), मोहम्मद अली जहूर 1923 काकिनाडा, मौलाना अबुल कलाम आझाद 1923 (दिल्ली) मुख्तार अहमद अन्सारी 1927 (मद्रास).

    यापैकी मौलाना अबुल कलाम आझाद हे 1940 ते 1946 हे सहा वर्षे काँग्रेसचे अध्यक्ष होते. परंतु 1947 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे पुन्हा अध्यक्ष बनले. त्यानंतर 2025 पर्यंत काँग्रेसने मुस्लिम नेत्याची अध्यक्षपदी निवड केलेली नाही. त्याउलट नेहरू + गांधी परिवारातील खुद्द पंडित मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांच्या कन्या इंदिरा गांधी, नातू राजीव गांधी, नातसून सोनिया गांधी आणि पणतू राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झालेत. परंतु कुठल्याही मुस्लिम नेत्याला काँग्रेसने अध्यक्षपदाची संधी दिलेली नाही.

    नेमकी हीच राजकीय नस ओळखून पंतप्रधान मोदींनी आज हरियाणातल्या हिस्सार मधून काँग्रेसवर हल्लाबोल केला. मुसलमान नेत्याला काँग्रेस अध्यक्ष बनवण्याचे आव्हान दिले. या पलीकडे जाऊन निवडणुकीतली 50 % तिकिटे मुस्लिमांना वाटण्याचे आव्हान देऊन मोदींनी सध्याच्या काँग्रेसला थेट मुस्लिम लीगच्या पारड्यात टाकून दिले. कारण मुस्लिम लीग हाच एकमेव पक्ष आहे, की जो 50 % ते 50 % पेक्षा जास्त मुस्लिमांना कुठल्याही निवडणुकीची तिकिटे देणारा आहे‌. बाकी कुठलाही स्वतःला धर्मनिरपेक्ष मानणारा पक्ष मुसलमानांना एवढ्या मोठ्या टक्केवारीत निवडणुकीची तिकिटे देत नाही. मोदींनी 50 % तिकिटाची गुगली टाकून पक्षाध्यक्षाच्या मुद्द्याबरोबरच तिकीट वाटपाच्या मुद्द्यावर देखील काँग्रेसची विकेट घेतली आहे.

    Congress elected Muslim presidents before independence, but not in Nehru Gandhi era

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    BCCI : भारत-पाकिस्तान तणावामुळे IPL-2025 स्थगित; BCCI ने घेतला मोठा निर्णय

    Operation sindoor : तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची “ढाल”; भारताने प्रेस ब्रीफिंग मध्ये वाचली पाकिस्तानची पापे, पण वाचा जे सांगितले नाही ते!!

    Nishikant Dubey : सुप्रीम कोर्टाने म्हटले- निशीकांत दुबे यांचे विधान बेजबाबदार; आम्ही फुले नाही जी अशा विधानांनी कोमेजतील