नाशिक : भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या युद्धात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे झुकले असा दावा करून राहुल गांधींनी त्यांच्यावर टीका केली पण त्याच वेळी काँग्रेसी प्रवृत्तीचे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारला अमेरिकेमुळे झुकायचाच सल्ला दिला. काँग्रेसने एक प्रकारे डबल ढोलकीचा बाजा वाजविला.
भारताने ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानवर हल्ला केला खरा पण डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आल्याबरोबर पाच तासांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यापुढे झुकले त्यांनी पाकिस्तान वरचे हल्ले थांबविले, असे टीकास्त्र राहुल गांधींनी मतदार अधिकार यात्रेतून सोडले. नरेंद्र मोदींची छाती 56 इंचाची वगैरे काही नाही ते घाबरट नेते आहेत, असा दावा त्यांनी केला. नरेंद्र मोदी अमेरिकेपुढे झुकल्याबद्दल राहुल गांधींनी त्यांना दूषणे दिली.
पण राहुल गांधींच्याच काँग्रेसी संस्कृतीचे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारला अमेरिकेपुढे झुकायचाच सल्ला दिला. ट्रम्प टेरिफच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तेल खरेदी करायच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा कारण त्यातून फक्त भारतातल्या रिफायनरी नफा कमवत आहेत, पण ट्रम्प टेरिफचा फटका इतर भारतीय कंपन्यांना बसतो आहे. ज्यादा टेरिफची किंमत इतर भारतीय कंपन्यांना चुकवावी लागत आहे. सबब भारताने रशियन तेल खरेदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहन रघुराम राजन यांनी केले.
– ट्रम्प यांची री
रशियाकडून चीन आणि युरोप जास्त तेल घेत असताना ट्रम्प यांनी फक्त भारतावरच जादा टेरिफ लादले. पण भारताने आता कुठल्याच देशावर व्यापारासाठी फार अवलंबून राहू नये भारताने नफा – नुकसानीचा विचार करून रशियन तेलावर अवलंबून राहू नये. त्या उलट युरोप + अमेरिका आणि आफ्रिका या देशांकडे वळावे. भारताचा विकास दर मोठा राखण्यासाठी हे गरजेचे आहे, अशी मखलाशी रघुराम राजन यांनी केली. भारताच्या नफा – नुकसानीचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. पण तो करतानाच त्यांनी मोठी मेख मारून ठेवली. त्यांनी अप्रत्यक्षपणे भारताने अमेरिकेपुढे झुकावे म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे मान्य करावे. रशियाकडून तेल खरेदी कमी करावी, अशी सूचना केली. भारताने स्वतःचा फायदा बघू नये. भारतीयांना स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळाले नाही तरी चालेल, पण भारत आणि रशियाकडून तेल खरेदी करून त्यांना डॉलर्स देऊ नये, हाच नेमका आग्रह ट्रम्प यांनी धरून भारतावर ज्यादा टेरिफ लादले.
– रघुराम राजन यांचे अक्षम्य दुर्लक्ष
रघुराम राजन यांनी राजकीय चतुराईने या मुद्द्याचा उल्लेख केला नाही. पण भारताने युरोप, अमेरिका आणि आफ्रिका या देशांकडे वळून व्यापार वाढवावा, अशी शहाजोग सूचना केली. भारतीय रिफायनरी नफा कमवत असल्याकडे बोट दाखविले. पण भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली आणि अमेरिका आणि अन्य देशांकडून तेल खरेदी केली तर भारतीय रिफायनरी किंवा अन्य कुठल्याही व्यापाऱ्यांना फायदा होण्यापेक्षा परदेशांमधल्या व्यापाऱ्यांना फायदा होईल याकडे हेतूत: बगल दिली. भारतीयांना स्वस्तात पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही पेट्रोल डिझेलची आणि त्याचबरोबर अन्य वस्तूंची प्रचंड महागाई होईल, या मुद्द्याकडे तर रघुराम राजन यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले.
Congress double standards over indian foreign and trade policy
महत्वाच्या बातम्या
- Mohan Bhagwat संघाला विरोध कमी होण्यामागे प्रेमाची शक्ती, मोहन भागवत यांचे प्रतिपादन
- BJP States : भाजपशासित राज्यांनी म्हटले- न्यायालय विधेयकांना मान्यता देऊ शकत नाही, हा फक्त राज्यपाल किंवा राष्ट्रपतींचा अधिकार
- गणपतीच्या पहिल्या दिवशी झाली बंधूंची भेटीगाठी; पण फोटोला पोज देताना घातली हाताची घडी!!
- Ganesh festival in other parts of the world : पहा जगातील कोणत्या कोणत्या देशात गणेशोत्सव साजरा होतो ?