• Download App
    ममता बॅनर्जींना यूपीए अध्यक्ष बनविण्याच्या प्रश्नच नाही, अध्यक्ष बदलाची चर्चा कॉंग्रेसने फेटाळली|Congress deny change in UPA president

    ममता बॅनर्जींना यूपीए अध्यक्ष बनविण्याच्या प्रश्नच नाही, अध्यक्ष बदलाची चर्चा कॉंग्रेसने फेटाळली

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : प. बंगालच्या निकालानंतर यूपीए अध्यक्ष बदलाबाबत उगाचच चर्चा सुरु झाल्या असून या चर्चा फेटाळताना सर्व विरोधी पक्षांचा सोनिया गांधींच्या नेतृत्वावर आजही विश्वास असल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे.Congress deny change in UPA president

    ममता बॅनर्जींना यूपीए अध्यक्ष बनविण्याच्या चर्चांबाबत छेडले असता प्रवक्ते शक्तीसिंह गोहिल म्हणाले देशातील बऱ्याच राजकीय पक्षांनी सोनिया गांधींची यूपीए अध्यक्षपदी निवड केली आहे.



    काही जणांनी या पदासाठी शरद पवार यांचे नाव चालविले असताना खुद्द पवार यांनीच राष्ट्रीय पक्ष म्हणून कॉग्रेसची भूमिका आणि सोनिया गांधींचे नेतृत्व मान्य असल्याचे तसेच सोनिया गांधीच यूपीएच्या अध्यक्ष असल्याचे म्हटले होते.

    या पदाबाबतचा निर्णय कार्यकर्ते किंवा पत्रकार नव्हे तर सर्व विरोधी पक्ष मिळून करतात. या सर्व पक्षांचा विश्वास आजही सोनिया गांधींसोबत आहे.यावेळी त्यांनी बंगालमधील हिंसाचाराच्या निमित्ताने तृणमुलला लक्ष्य केले.

    कोणत्याही प्रकारचे दंगे, हिंसाचार, कायदा हातात घेणे योग्य नाही. कॉंग्रेसने कधीही हिंसाचाराचे समर्थन केलेले नाही. ममतादिदींना प्रचंड बहुमत मिळाले, जनतेचे प्रेम मिळाले आहे.

    आता त्यांचे कर्तव्य आहे की या हिंसाचाराला आळा घालावा. हिंसाचारात मृत्यूमुखी पडणारा भाजपचा कार्यकर्ता असला तरी आमची संवेदना त्यांच्यासोबत आहे.

    Congress deny change in UPA president

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!