• Download App
    लोकसभा पोटनिवडणुकीत तीनपैकी दोन जागांवर भाजपचा पराभव, काँग्रेसची टीका - मोदीजी, अहंकार सोडा, काळे कायदे मागे घ्या!|Congress Criticizes BJP After By election result Randeep Surjewala says Stop Petrol Diesel Gas Loot

    लोकसभा पोटनिवडणुकीत तीनपैकी दोन जागांवर भाजपचा पराभव, काँग्रेसची टीका – मोदीजी, अहंकार सोडा, काळे कायदे मागे घ्या!

    देशातील अनेक राज्यांतील तीन लोकसभा आणि 29 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला अहंकार सोडावा, असे म्हटले आहे. पोटनिवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने त्यांनी सरकारला घेरले आणि तीन कृषी कायदे मागे घ्या, असे सांगितले. पुढील वर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी देशाचा मूड म्हणून या पोटनिवडणुकांच्या निकालांकडे पाहिले जात आहे.Congress Criticizes BJP After By election result Randeep Surjewala says Stop Petrol Diesel Gas Loot


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांतील तीन लोकसभा आणि 29 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला अहंकार सोडावा, असे म्हटले आहे.

    पोटनिवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने त्यांनी सरकारला घेरले आणि तीन कृषी कायदे मागे घ्या, असे सांगितले. पुढील वर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी देशाचा मूड म्हणून या पोटनिवडणुकांच्या निकालांकडे पाहिले जात आहे.



    रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवर लिहिले की, “लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने 3 पैकी 2 जागा गमावल्या आहेत. काँग्रेस-भाजपमध्ये थेट लढत असलेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचा पराभव झाला आहे. हिमाचल, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र हे त्याचे पुरावे आहेत. मोदीजी, राजहट सोडा! 3 काळे कायदे मागे घ्या. पेट्रोल-डिझेल-गॅसची लूट थांबवा. अहंकार सोडा.”

    हिमाचल प्रदेशात सत्ताधारी भाजपचा दारुण पराभव झाला आहे. मंडी लोकसभा आणि 3 विधानसभा मतदारसंघांवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने क्लीन स्वीप केला. मंडी संसदीय जागेवर, दिवंगत मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी, काँग्रेस उमेदवार प्रतिभा सिंह यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी कारगिल युद्ध नायक आणि भाजप उमेदवार खुशाल ठाकूर यांचा पराभव केला. याशिवाय हिमाचल प्रदेशातील तीनही विधानसभा जागा (फतेहपूर, जुब्बल-कोटखाई आणि अर्की) काँग्रेसने जिंकल्या आहेत.

    दुसरीकडे दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन मोहन डेलकर यांचा 51,009 मतांनी विजय झाला आहे. शिवसेनेच्या उमेदवाराला 1,16,834 मते मिळाली.

    तर भाजप उमेदवाराला 66,270 मते मिळाली. खासदार (अपक्ष) मोहन डेलकर यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणूक झाली. पोटनिवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात होते. डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली असून भाजपने महेश गावित आणि काँग्रेसने महेश धोडी यांना रिंगणात उतरवले आहे.

    Congress Criticizes BJP After By election result Randeep Surjewala says Stop Petrol Diesel Gas Loot

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य