• Download App
    Congress convert itself in counting clerk ऑं... अख्खी काँग्रेसच मोजणी

    ऑं… अख्खी काँग्रेसच मोजणी कारकूनांच्या संघटनेत convert झाली की काय??

    Congress convert

    नाशिक : आत्तापर्यंत काँग्रेस हा देशातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष असल्याचे मानले जात होते. कारण काँग्रेसने आतापर्यंत देशात किमान 55 ते 60 वर्षे राज्य केले. देशाला 7 पंतप्रधान दिले. वेगवेगळ्या राज्यांमध्ये अजूनही राज्य करत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत मान्यतेनुसार काँग्रेस अजूनही देशातला मोठा राजकीय पक्ष आहे.Congress convert itself in counting clerk

    पण काँग्रेस नेत्यांच्या सध्याच्या राजकीय कर्तुती पाहिल्या, तर काँग्रेसने आपल्या पक्ष संघटनेचे रूपांतर मोजणी कारकुनांच्या संघटनेत केले की काय??, अशी वेळ आली. कारण काँग्रेसच्या मुख्य प्रवक्त्यांसह अख्खी काँग्रेसच मोजणी कारकुनांच्या भूमिकेत शिरल्याचे दिसून आले. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प तात्या यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या न झालेल्या ceasefire चे credit किती वेळा घेतले?? ते मोजायला लागली.



    आतापर्यंत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश हेच फक्त ट्रम्प तात्या यांनी ceasefire चे credit किती वेळा घेतले, हे मोजून त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल करत होते. ट्रम्प आठ वेळा ceasefire विषयी बोलले, पण मोदींनी अजून उत्तर दिले नाही. मग ते अकरा वेळा विषयी बोलले तरीही मोदी अजून बोलले नाहीत, असे जयराम ररमेश‌ यांनी वारंवार मोदींना टोचले, पण काही झाले तरी फक्त जयराम रमेश किंवा अगदी पवन खेडा हे दोनच प्रवक्ते ट्रम्प तात्यांनी घेतलेले credit मोजत होते. पण मोदींनी त्यांना तेवढ्याच वेळा कोलले, हे त्यांना दिसले नाही.

    पण त्यापलीकडे जाऊन आता काँग्रेसचे सोशल मीडिया हँडल पाहिले, तर अख्या काँग्रेस पक्षाचे ट्रम्प तात्यांचे credit मोजायला लागल्याचे आढळून आले. ट्रम्प तात्या घालतात, ती टोपी दहा वेळा फिरवून काँग्रेसने मोदींना त्यावरून प्रश्न विचारला. ट्रम्प तात्यांनी दहा वेळा ceasefire चे credit घेतले, पण मोदी अजून एकदाही काही बोलले नाहीत, अशी टीका काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडल वरून करण्यात आली.

    – GDP ची नकारात्मक मोजणी

    पण काँग्रेसने केवळ ट्रम्प तात्यांच्या credit ची मोजणी केली असे नाही, तर पक्षाने देशाच्या GDP ची देखील नकारात्मक मोजणी केली. भारताने नुकतेच जपानला मागे टाकून जगातल्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेचे स्थान मिळवले. त्याबद्दल मोठ-मोठ्या बातम्या सगळ्या माध्यमातून छापून आल्या. त्याच्यावर मोठमोठे व्हिडिओ शेअर झाले. पण काँग्रेसला मात्र GDP तली नकारात्मक वाढ‌दिसली. भारताची GDP वाढ गेल्या चार वर्षांमध्ये प्रथमच नीचांकी पोचली असा व्हिडिओ काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला, तर काँग्रेसच्या दुसऱ्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी मोठ्या अर्थतज्ज्ञाचा आव आणून भारताला 7.4 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे, पण मोदी सरकार 6.3 टक्क्यांचा‌ आकडा फेकून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी भारताची किती राफेल पाकिस्तानने पाडली??, याचा आकडा मागितला होता.

    ही सगळी आकडेवारीची मोजणी काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर टाकली आणि पक्ष संघटनेचे रूपांतर मोजणी कारकुनांच्या संघटनेत केल्याचे दाखवून दिले.

    Congress convert itself in counting clerk

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार