विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे राजकारण आता उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खीरीच्या घटनेभोवती फिरत आहे. काँग्रेसचे दोन मुख्यमंत्री छत्तीसगडचे भूपेश बघेल आणि पंजाबचे चरणजीत सिंग चन्नी हे दोन्ही नेते आपले राज्य सोडून लखीमपूरला जाण्यासाठी आग्रह धरत आहेत. तेथे जाऊन मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. Congress chief minister urges to go to Lakhimpur; BJP opposes laying the groundwork
दोन्ही राज्यांच्या शासकीय यंत्रणा त्यासाठी त्यांनी कामाला लावल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारने मात्र त्यांच्या लखीमपूरला येण्याच्या मार्गावर प्रतिबंध लावला आहे. दोन्ही नेत्यांची हेलिकॉप्टर लखनऊ किंवा अन्य शहरांमध्ये उतरू दिली जाऊ नयेत, असे आदेश उत्तर प्रदेश प्रशासनाने काढले आहेत.
त्यावर पंजाब आणि छत्तीसगड यांच्या प्रशासनांनी उत्तर प्रदेश प्रशासनाला मुख्यमंत्र्यांना रस्ते मार्गाने उत्तर प्रदेश मध्ये येऊ द्यावे, अशी पत्रे पाठविली आहेत. त्यालादेखील उत्तर प्रदेश प्रशासनाने नकार दिला आहे.
लखीमपूर खीरीच्या आठ शेतकरी ठार झाल्याच्या घटनेचे एवढे राजकीयीकरण झाले आहे की सर्व विरोधकांनी मिळून एकत्रित रित्या तेथे जाण्याचा चंग बांधला आहे. प्रियांका गांधी, अखिलेश यादव, भूपेश बघेल, चरणजीत सिंग चन्नी आदी नेत्यांनी तिथे जाण्याचा प्रयत्न करताच त्यांना अडविण्यात आले आहे. प्रियांका गांधी आणि भूपिंदरसिंग हुडा यांना सीतापूरमध्ये रोखून धरण्यात आले, तर अखिलेश यादव यांना लखनऊमध्ये थांबविण्यात आले. अखिलेश यादव यांना लखीमपूर खीरीला जाऊ दिले नाही याच्या निषेधार्थ समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लखनऊ पोलिसांची गाडी पेटवली.
भाजपने मात्र या सर्व प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करून काँग्रेसच्या राज्यांमध्ये अशी कोणतीही घटना घडली आणि अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तेथे जाण्याचा आग्रह धरला तर काँग्रेस नेत्यांना चालेल का?, असा सवाल करणारे ट्विट भाजपचे सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी केले आहे. अशा पद्धतीचा राजकीयीकरण करण्याचा पायंडा पाडणे चूक आहे, अशी टीकाही त्यांनी या ट्विटमध्ये केली आहे.
काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या लखीमपूर खीरीला जाण्याच्या आग्रहावरून “पॉलिटिकल टुरिझमची” टीका सुरू झाली आहे. प्रियांका गांधी यांनी सर्व विरोधकांना लखीमपूरला जाऊन तेथील तपासामध्ये अडथळा आणायचा आहे. जन्मात पेटवण्याचा प्रयत्न करायचा आहे, असा आरोप भाजपचे नेते सिद्धार्थ नाथ सिंह यांनी केला आहे. त्यांना मृतदेहांवरून आपली राजकारणाची गाडी चालवायची असेल तर कोण काय करणार?, असा उद्विग्न सवाल देखील सिद्धार्थ नाथ सिंह यांनी केला आहे.
Congress chief minister urges to go to Lakhimpur; BJP opposes laying the groundwork
महत्त्वाच्या बातम्या
- अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे चार दिवसांत पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
- आर्यन खानविरूद्धची कलमेच अशी गंभीर आहेत की त्याला होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा!!
- शिवलीला पाटील बिग बॉस मधून बाहेर पडल्याने विशाल झाला भावूक , म्हणाला – ” ती असायला हवी होती , खूप काही शिकवून गेली. “
- #लखीमपुरकिसाननरसंहार ट्विटरवर ट्रेंडनंतर #योगीजीलठ_बजाओ देखील ट्रेंडिंगला!!