प्रतिनिधी
लखनौ : गँगस्टर माफिया अतीक अहमद भारतरत्न देण्याची मागणी केली त्यामुळे काँग्रेसची गोची झाली आणि काँग्रेसला उमेदवाराची हकालपट्टी करावी लागली. असे उत्तर प्रदेशात घडले आहे.Congress candidate embarrassed party by demanding bharat ratna for atiq ahamad, Congress sacked him
काही दिवसांपूर्वी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची हल्लेखोरांनी गोळ्या झाडून पोलिसांसमोर हत्या केली होती. या घटनेची उत्तर प्रदेशात नव्हे तर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. यानंतर अतिक अहमदला भारतरत्न देण्याची मागणी करणाऱ्या एका काँग्रेस नेत्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यामुळे काँग्रेसची पुरती गोची झाली. त्याचे हे वैयक्तिक वक्तव्य असल्याचे काँग्रेसला सांगावे लागून त्या उमेदवाराचीच पक्षातून हकारपट्टी करावी लागली.
राजकुमार सिंग उर्फ रज्जू भैया असे या काँग्रेस नेत्याचे नाव आहे. राजकुमार सिंग यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून अतीक अहमदला भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राजकुमार यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेसने त्यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. तसेच राजकुमार सिंग यांनी केलेले वक्तव्य वैयक्तिक असून पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नसल्याने काँग्रेसने आता स्पष्ट केले आहे.
काँग्रेसने राजकुमार सिंग यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली असून महापालिका निवडणुकीसाठी दिलेली त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली आहे. तसेच व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारावरून राजकुमार सिंग यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे.
Congress candidate embarrassed party by demanding bharat ratna for atiq ahamad, Congress sacked him
महत्वाच्या बातम्या
- येमेनमध्ये चॅरिटी इव्हेंटमध्ये चेंगराचेंगरी, 85 ठार, हुथी सैन्याने गर्दीवर नियंत्रणासाठी केला गोळीबार
- अजितदादांच्या कथित बंडाने काय साधले??; राष्ट्रीय विरोधी ऐक्याचे भीष्मपितामह संशयाच्या जाळ्यात अडकले!!
- विदेशी निधी प्रकरणी ऑक्सफॅम इंडियाविरुद्ध CBIने दाखल केला गुन्हा!
- ‘डझनभर मुलांना जन्म देणाऱ्यांची ही लोकसंख्या आहे’, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची टिप्पणी!