विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दोन महिन्यांवर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आली, पण काँग्रेस अजून स्वतःचा मुख्यमंत्री ठरवेना, महाविकास आघाडीलाही तो ठरवू देईना, पण पाच वर्षांनी जी लोकसभेची निवडणूक होणार आहे, त्या निमित्ताने राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाचा मात्र काँग्रेस नेत्यांनी 100 % वायदा केला आहे. Congress assumes 100 % guaranty of rahul Gandhi’s prime ministership
2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचा परफॉर्मन्स अव्वल झाल्यावर पक्षाच्या नेत्यांचा हुरूप वाढला. महाविकास आघाडीत काँग्रेसची “दादागिरी: सुरू झाली. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करून आपण निवडणुकीला सामोरे जाऊ असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांची मागणी काँग्रेस नेत्यांनी फेटाळली. उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चेहरे काँग्रेसने नाकारले.
स्वतःचा पण चेहरा पुढे करायला नकार दिला. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची “परंपरा” ठाकरे आणि पवारांना शिकवली. पण काँग्रेसने मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्याचेही जाहीर केले नाही. उलट महाविकास आघाडीतल्या सगळ्यांचाच दावा लटकत ठेवला.
त्याउलट जी लोकसभेची निवडणूक पाच वर्षांनी म्हणजे 2029 मध्ये होणार आहे, त्यावेळी मात्र काँग्रेसची सत्ता आली, तर राहुल गांधीच 100% पंतप्रधान होतील, असे काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी जाहीर करून टाकले. राहुल गांधी विरोधी पक्ष नेते म्हणून गांभीर्याने काम करत आहेत. ते प्रत्येक मुद्द्यावर थेट बोलतात. त्यातून त्यांचे समर्पण दिसते. आत्तापर्यंत जे राहुल गांधींची चेष्टा करायचे, त्यांना याचा धक्का बसला आहे. राहुल गांधी जे बोलतात, तेच करतात. त्यात ते फरक करत नाहीत. त्यामुळे काँग्रेसची सत्ता आल्यावर राहुल गांधी हेच 100 % पंतप्रधान पदाचे दावेदार असतील, अशी भलामण अभिषेक मनू सिंघवी यांनी केली.
काँग्रेसने अभिषेक मनू सिंघवी यांना तेलंगणातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आणले. त्यानंतर त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाची स्तुती करत त्यांना पंतप्रधान पदाचे 100 % दावेदार असल्याचे जाहीर केले. याला विशेष महत्त्व आहे.
Congress assumes 100 % guaranty of rahul Gandhi’s prime ministership
महत्वाच्या बातम्या
- Tejashwi Yadav : सॅम पित्रोदा यांचा आत्मा तेजस्वी यादवमध्ये आहे का? – भाजपचा टोला!
- Haryana assembly elections : हरियाणा विधानसभा निवडणुकीची नवी तारीख जाहीर!
- Giriraj Singh attack : बेगुसराय येथे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला
- Ladki Bahin Yojna In Nagpur : नागपुरात लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमात कृतज्ञता आणि उत्साहाची अपूर्व जोड!!