तीन माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्रही उमेदवार ठरले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरी यादी जारी केली आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत ४३ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी आमच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.Congress announced the list of 43 candidates from six states including Madhya Pradesh Rajasthan
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांनाही उमेदवारी दिली आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ यांना मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून तिकीट देण्यात आले आहे. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत यांना जालोरचे तिकीट देण्यात आले आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा मुलगा गौरव गोगोई यांना जोरहाटमधून तिकीट देण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी दुसरी यादी जाहीर केली. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत ६ राज्यांमधून ४३ नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये आसाममधून १२, गुजरातमधून ७, मध्य प्रदेशातून १०, राजस्थानमधून १०, उत्तराखंडमधून ३ आणि दमण बेटातून १ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. काँग्रेसच्या या यादीत १३ ओबीसी, १० एससी, ९ एसटी आणि एक मुस्लिम उमेदवार आहेत.