- कॉंग्रेस कार्यकारिणी रमली मूर्खांच्या नंदनवनात!!
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव होऊन आठवडा लोटला तरी काँग्रेस मधले राजकीय घमासान थांबायला तयार नाही. एकीकडे काँग्रेस कार्यकारिणीने गांधींच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब केले असताना दुसरीकडे काँग्रेस कार्यकारिणी बाहेरचे नेते मात्र प्रचंड अस्वस्थ आहेत ही अस्वस्थता आजच वरिष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी उघडपणे बोलून दाखवली. Congress and Gandhis: Save “Sub Ki Congress”, not “Ghar Ki Congress”; Tahoe of Kapil Sibal
आठ वर्षांनंतर आपल्याला पराभवाची मीमांसा नीट करता येत नसेल तर आपण मुर्खांच्या नंदनवनात वावरत आहोत हे मान्य करावे लागेल असे शरसंधान कपिल सिब्बल यांनी काँग्रेस कार्यकारिणीवर सोडले आहे. त्याच वेळी त्यांनी “घर की काँग्रेस” नव्हे, तर “सब की काँग्रेस” वाचवण्याची गरज आहे, असा टाहो फोडला. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली परखड मते मांडली.
8 वर्षांनंतरही आपल्या ऱ्हासाची कारणं काँग्रेस नेतृत्वाला शोधता येत नसतील तर आपण मूर्खांच्या नंदनवनात रमलो आहोत अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केली. काँग्रेसमधील नाराज 23 नेत्यांमध्ये सिब्बल एक प्रमुख नेते आहेत.
सब की काँग्रेस असायला हवी पण काही नेत्यांना घर की काँग्रेस हवी आहे… माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी सब की काँग्रेससाठी लढा देईन असं सिब्बल म्हणाले. काँग्रेस कार्यकारिणी ख-या काँग्रेसचं प्रतिनिधित्व करतच नाही असा घणाघाती वार त्यांनी केलाय.
खरी काँग्रेस CWC च्या बाहेर आहे. त्यांचा आवाज ऐकण्याची गरज आहे. काँग्रेसमध्ये सुधारणांची मागणी करणाऱ्या ग्रुप 23 च्या नेत्यांमध्ये कपिल सिब्बल हे पहिले नेते आहेत, ज्यांनी सोनिया गांधींना पायउतार व्हावे असे उघडपणे आवाहन केले आहे. आता गांधी घराण्याने काँग्रेस नेतृत्वाचा भार सोडून दुसऱ्या नेत्याला जबाबदारी द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
सर्वांची काँग्रेस म्हणजे केवळ सोबत राहणे नव्हे, तर भारतातील ज्यांना भाजप नको आहे अशा सर्वांना एकत्र आणणे. या देशातील सर्व संस्थांच्या निरंकुश कारभाराच्या विरोधात असलेल्या परिवर्तनाच्या सर्व शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे. असेही कपिल सिब्बल यांनी केली आहे.
Congress and Gandhis : Save “Sub Ki Congress”, not “Ghar Ki Congress”; Tahoe of Kapil Sibal
महत्त्वाच्या बातम्या
- ईडी टोचे नवाबा…
- लहान मुलांच्या कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेला होणार सुरुवात; १२ ते १४ वयोगटासाठी
- एकाच दिवशी १०१ ईलेक्ट्रिक कारची खरेदी, औरंगाबादकरांचा विक्रम; २५ कार महिलांनी घेतल्या
- The Kashmir Files : महिनाभरानंतर “द काश्मीर फाईल्स” सिनेमा झी- 5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
- गांधीवादी कार्यकर्ते जयवंत मठकर यांचे निधन