• Download App
    संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या तटस्थ भूमिकेचे कॉँग्रेसकडूनही समर्थन|Congress also supports India's neutral role in the United Nations

    संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या तटस्थ भूमिकेचे कॉँग्रेसकडूनही समर्थन

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासभेत (यूनो) मतदानापासून दूर राहण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेचे काँग्रेस नेत्यांनी समर्थन केले आहे. भारताने संयुक्त राष्ट्र्रसंघात रशियाच्या विरोधात मतदानात भाग घेण्याचे भारताने टाळले आहे.Congress also supports India’s neutral role in the United Nations

    परराष्ट्र मंत्रालयात झालेल्या संसदेच्या परराष्ट्र व्यवहार सल्लागार समितीच्या बैठकीत युक्रेनमध्ये सुरू असलेल्या रशियन लष्करी कारवायांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी संसदीय समितीला निर्वासन प्रक्रिया आणि सद्यस्थितीची माहिती दिली. काँग्रेस नेत्यांनी यूएनजीएमध्ये मतदानापासून दूर राहण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेचे समर्थन केल्याचे सूत्रांनी सांगितले. भारताने पुन्हा एकदा युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये रशियाच्या विरोधात मतदानात भाग घेण्याचे टाळले आहे.



    जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी, शशी थरूर, आनंद शर्मा, शिवसेनेच्या प्रियांका चतुवेर्दी, आरजेडीचे प्रेमचंद्र गुप्ता, भाजपचे जीव्हीएन नरसिंह राव आदींनी भाग घेतला. यात परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशिवाय मंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित होते.

    युक्रेनमधील घडामोडींवर परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्लागार समितीची बैठक नुकतीच संपली. या समस्येच्या धोरणात्मक आणि मानवतावादी आयामावर चांगली चर्चा झाली. युक्रेनमधून सर्व भारतीयांना परत आणण्याच्या प्रयत्नाच्या बाजूने एक मजबूत आणि एकमत संदेश मिळाला, असे ट्विट बैठकीनंतर जयशंकर यांनी केले. बैठकीत परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी युक्रेनमधील परिस्थिती आणि तेथून भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांची माहिती दिली.

    युक्रेनच्या मुद्द्यावर परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित सल्लागार समितीची बैठक पार पडली. सर्वसमावेशक माहिती आणि आमच्या प्रश्नांची आणि चिंतांची अचूक उत्तरे दिल्याबद्दल मी एस जयशंकर आणि सहकाºयांचे आभार मानतो. याच भावनेने परराष्ट्र धोरण पाळले पाहिजे,

    असेट ट्विट बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी केले. सहा राजकीय पक्षांच्या नऊ खासदारांनी बैठकीत सहभाग घेतला होता. काँग्रेसकडून राहुल गांधी, आनंद शर्मा आणि मी त्यात सहभागी झालो होतो. सौहार्दपूर्ण वातावरणात मोकळेपणाने चर्चा झाली, असेही ते म्हणाले.

    Congress also supports India’s neutral role in the United Nations

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही