भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांना आता जळी-स्थळी-काष्टी केवळ कमळच दिसत आहे. त्यामुळे फुलांच्या पाकळ्यांच्या आकारातील शिवमोगा येथील विमानतळ कमळाच्या आकाराचे केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र, खासदार बी. वाय. राघवेंद्र यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.Congress allegations that Shivamogga airport terminal is shaped like a lotus
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांना आता जळी-स्थळी-काष्टी केवळ कमळच दिसत आहे. त्यामुळे फुलांच्या पाकळ्यांच्या आकारातील शिवमोगा येथील विमानतळ कमळाच्या आकाराचे केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र, खासदार बी. वाय. राघवेंद्र यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
राघवेंद्र म्हणाले, शिवमोगा विमानतळ टर्मीनलचा आकार हा फुलांच्या पाकळ्यांप्रमाणे आहे. मात्र, कमळासारखा नाही. हे टर्मीनल केवळ फुलांच्या आकाराचे आहे. हा आराखडा विमानतळ प्राधीकरणाने मंजूर केला आहे.
शिवमोगा येथील विमानतळाचे काम लवकरच सुरू होणार आहे. याचा आराखडा करण्यात आला आहे. मात्र, कॉँग्रेसने आरोप केला आहे की या विमानतळ टर्मीनलच्या थ्रीडी स्केचमध्ये त्याचा आकार हा भाजपाचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळासारखा आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचे चिरंजीव असलेल्या राघवेंद्र यांनी म्हटले आहे की, कर्नाटकसाठी हा विमानतळ प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. यामुळे या परिसराचे भाग्यच बदलून जाणाार आहे. मात्र, विरोधी पक्षाचे नेते यामध्ये निष्कारण वेगळेच मुद्दे काढत आहेत. त्यांनी या प्रकल्पासाठी काहीही काम केलेले नाही. माझे वडील मुख्यमंत्री झाल्यावर या विमानतळाच्या कामाला गती मिळाली आहे.
राघवेंद्र म्हणाले, देशातील अनेक चांगल्या प्रकल्पांना कॉँग्रेसने इठदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची नावे दिली. आता महत्वाकांक्षी प्रकल्पांना विरोध करून ते राज्याच्या विरोधाचे काम करत आहेत.
Congress allegations that Shivamogga airport terminal is shaped like a lotus
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेची औरंगाबादेत गुंडगिरी, शिवसंग्रामच्या बैठकीत घातला गोंधळ
- २५ जून १९७५; उजेडात होते पुण्य, अंधारात पाप…!!
- लसीकरणाबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्याचे सोनिया गांधींनीच उपटले कान, आता जयराम रमेश काय म्हणणार?
- राहूल गांधींना आठवेना सर्व मोदी चोर आहेत म्हटल्याचे, म्हणाले हा तर फक्त राजकीय टोमणा होता
- घरपोच दारू मागविताना शबाना आझमी यांची झाली फसवणूक